कळमनुरी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती जिल्हा परिषद सीईओ विवेक गायकवाड यांचे आदेश



प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी

प्रशासक नियुक्त ग्रामपंचायती आखाडा बाळापूर, आडा, आसोला, आसोलवाडी, बेलमंडळ, बाभळी, बऊर, बेलधर, भाटेगाव, भोसी, भुरक्याचीवाडी, बिगगव्हाण, बोथी, चाफनाथ, चिखली, चिंचोडी, चुंचा, दाभडी, दांडेगाव, दाती, देवजना, धानोरा (ज), तरोडा, डिग्गी, दिग्रस (बु.), दिग्रस तर्फे कोंढुर, डोंगरकडा, डोंगरगाव नाका, डोंगरगाव पूल, फुटाणा, गारोळ्याचीवाडी, घोळवा, मालेगाव, गौळ बाजार, कुंडलवाडी, हारवाडी, हिवरा (त.ज.), जांब जामगव्हाण, जांभरुण, जरोडा, जवळापांचाळ, कडदेव, कळमकोंडा, कामठा, कानेगाव, कसबे धावंडा, कवडी, कवडा, खापरखेडा, खरवड, किल्ले वडगाव, कोंढुर, कोपरवाडी, कुंभारवाडी, महारी (बु.), माळधावंडा, मोरगव्हाण, मोरवड, मुंढळ, नांदापूर, नरवाडी नवखा, निमटोक, पावनमारी, पोञा, पुयना, रामेश्वर, रामेश्वरतांडा, रामवाडी, रेडगाव, रेनापुर, रुद्रवाडी, रुपुर, साळवा, सांडस, सावंगी (भुत.), सापळी, सेलसुरा, शेनोडी, शेवाळा, शिवनी (बु.), सिंदगी, सुकळीवीर, टव्हा, तेलंगवाडी, तोंडापूर, उमरदरावाडी, उमरा, वाई, वरुड, वारंगा (त.ना.), वडगाव (त.त.), येडशी, येगाव, येहळेगाव (ग), येहळेगाव (तु), झरा, झुंनझुनवाडी आदी

कळमनुरी तालुक्यात जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपलेल्या एकूण १०९ ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील तरतुदीनुसार हे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी निर्गमित केले आहेत. नैसर्गिक आपत्ती, आणीबाणी अथवा महामारीसारख्या परिस्थितीत राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका घेणे शक्य न झाल्यास प्रशासक नेमण्याची तरतूद अधिनियमात आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशा वेळी शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करणे असते. त्या अनुषंगाने कळमनुरी तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (आरोग्य) व विस्तार अधिकारी (शिक्षण) आदी अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment