कळमनुरी येथे बंजारा समाजाचे श्री रामचंद्र स्वामी महाराज व जगदंबा देवी पालखी व यात्रेची सांगता



दिनेश पत्की कळमनुरी 

गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी कळमनुरी येथील लमणदेव मंदिर  श्री रामचंद्र स्वामी महाराज आणि जगदंबा देवी लमणदेव मंदिर बंजारा समाज यांनी या यात्रेचे प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आयोजन केले होते लमlणदेव मंदिर येथून बंजारा समाजाकडून पालखी काढण्यात आली या पालखी सोहळ्यात हजारो समाज बांधव तसेच गावकरी सहभागी झाले होते या पालखी सोहळ्यात पारंपरिक वेशभूषा परिधान करून बंजारा भक्ती गीते गात मिरवणूक मार्गातून  मंदिर परिसरात पोहोचली. मंदिर परिसरातील भाविकांनी पूजा आणि प्रार्थना केली. महाराष्ट्र, राज्य आणि इतर राज्यांतील अनेक लोकांनी या यात्रेत भाग घेतला.

१९ आणि २० फेब्रुवारी रोजी जगभरातील हजारो भाविकांनी मंदिर परिसरात पूजा आणि प्रार्थना केली आणि दोन दिवसांच्या यात्रेचा आनंद घेतला. यावेळी हिंगोली जिल्हा पोलीस कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक उपस्थित होते. व पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता 


No comments:

Post a Comment