किनवट शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
दै. दर्पण प्रतिनिधी शेख अमिरपाशा
किनवट शहरातील शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलानगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार उपनगराध्यक्ष मोहम्मद हसन खान पठाण.बेबीताई नाईक शहरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. . प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जय शिवाजी, जय शिवरायच्या घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले होते.
यावेळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. पोलीसप्रशासन सदर रक्तदान शिबिरास भेट देऊन आम्ही स्वतः व पोउपनी सागर झाडे, पोह प्रदीप अत्राम, पो.अ. सुनिल अन्नमवार असे सर्वांनी रक्तदान केले आहे.
सविनय सादर,नगरपरिषद तसेच किनवट विविध सर्वांनी रक्तदान केले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर व शिवचरित्रावर आधारित नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या कार्यक्रमास किनवट शहरातील गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

No comments:
Post a Comment