जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कॉस्मेट येथे 2006-07 बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले



किनवट प्रतिनिधी: शेख आमिरपाशा 

जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कोसमेट येथे शैक्षणिक वर्ष २००६-०७ मधील दहावी उत्तीर्ण माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन दिनांक १९ फेब्रुवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. तब्बल २० वर्षांनंतर एकत्र येण्याचा आनंद माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व शिवजयंती साजरी करून करण्यात आली. यावेळी मंचावर माजी मुख्याध्यापक राऊत सर, राठोड सर, जाधव सर तसेच विद्यमान मुख्याध्यापक काळेवाड सर उपस्थित होते.

“पुन्हा एकत्र येऊया, जुन्या आठवणींना उजाळा देऊया” या उक्तीप्रमाणे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी उपस्थित सर्व माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी व गुरूजनांचा सत्कार करण्यात आला. राऊत सर यांचा सत्कार गजानन सोमेवाड यांनी, राठोड सर यांचा सत्कार माधव याटेवाड यांनी तर जाधव सर यांचा सत्कार डॉ. कांचन राऊत व श्रीनाथ खरोडे यांनी केला. तसेच माजी विद्यार्थ्यांतर्फे शाळेस छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट दिनेश हनुमंते यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. कांचन राऊत यांनी केले. कार्यक्रमात ॲडव्होकेट दिनेश हनुमंते, श्रीनाथ खरोडे, श्रीनिवास तुप्तेवार, इमरान घोडके, समाधान जाधव, गजानन सोमेवाड, गजानन राजारपल्लू, माधव याटेवाड, रामप्रसाद कदम, मारोती शंक्केपल्लू, नामदेव वाघमारे, विशाल शेळके, शिवशंकर यगलेवाड, शिवाजी चव्हाण, अक्षय शेवाळे, भारतीय जनता युवा मोर्चा नांदेड जिल्हा उपाध्यक्ष शेख लतिफ, ज्ञानेश्वर येलचेटवाड, बालाजी येलचेटवाड, गोविंद कन्नावार, धम्मपाल सोनकांबळे, बालाजी पल्लाडे, सौ. कल्याणी पेनशनवार - रुद्रकंठवार , डॉ. कांचन राऊत-नरवाडे, सौ. धनश्री जाधव-शिंदे, सौ. संगिता मॅकलवाड बक्केवाड, सौ. सरस्वती जाधव-पाशमवाड, सौ. शारदा वाघमारे-गोरे, सौ. सरोजनी बंकलवाड, सौ. सपना तोकलवाड-वटटवाड, संदीप नरवाडे, सुनील थोटे, शेख फैयाज, शेख करिम पटेल, मारोती तोरकड, नदिम सिद्दीकी, रेशमाजी वाघमारे, आनंद सूर्यवंशी, आनंद चंद्रे आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment