गोटेवाडी आश्रमशाळेतील गंभीर प्रकारांची चौकशी करा..आदिवासी युवक कल्याण संघाची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी



दिनेश पत्की कळमनुरी

कळमनुरी तालुक्यातील गोटेवाडी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळा येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह मूलभूत सोयी-सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत.

८ फेब्रुवारी रोजी आश्रम शाळेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थी विशाल उत्तम मुकाडे हा इमारतीवरून पडून गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे शाळा प्रशासना चा हलगर्जीपणा स्पष्ट होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करूनदोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, कळमनुरी येथील प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आलेआहे की, घटनेच्या दिवशी शाळेलl पुरेसे 

कर्मचारी उपस्थित असते व योग्य देखरेख झालीअसती, तर ही दुर्घटना टाळता आली असली. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी. तसेच काही नामांकित इंग्रजी शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना वेगळ्या वर्गात बसवून त्यांच्याशी भेदभाव केला जात असल्याच्या तक्रारीही प्राप्त होत आहेत.

आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशालां यामुळे हरताळ फासला जात असून, अशा सर्व शाळांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या शाळांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय शासकीय आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश,  व इतर आवश्यक साहित्याच

वाटप करण्यात आलेले नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच अनेक कर्मचारी गैरहजर राहत असून रात्रीच्या वेळी निवासी कर्मचारी शाळेच्या परिसरात राहत नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे निवासी राहत नसलेल्या कर्मचान्यांवर तात्काळ कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

 बरील सर्व मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते, बबन डुकरे ,   नागोराव खुडे यांच्यासह पदाधिकाऱ्याांच्या सह्या आहेत. 


No comments:

Post a Comment