"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" अंतर्गत पी. एम. श्री. कुमार विद्यामंदिर शाळा नं. 3 कुरुंदवाड. कोल्हापूर जिल्ह्यात अव्वल..
प्रतिनिधी - संतोष माने
'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' स्पर्धेमध्ये पी. एम. श्री. कुमार विद्यामंदिर नं. 3 कुरुंदवाड प्रशालेचे कोल्हापूर विभागात (कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग 5 जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून कोल्हापूर जिल्ह्यात ऐतिहासिक कामगिरी करत विभाग स्तरावर पहिला क्रमांक मिळवणारी पहिलीच शाळा ठरली आहे.
या कामगिरीमुळे शिरोळ तालुका व कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे..तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठीही शाळा पात्र झाली आहे .
शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.रविकुमार पाटील सर व त्यांच्या सर्व स्टाफ यांच्या वर कोल्हापूर जिल्हयातून तसेच शिरोळ तालुक्यातून शुभेच्यांचा वर्षाव होत आहे.
Labels:
10 Feb 2026

No comments:
Post a Comment