अमेरिकेसोबतची ट्रेड डील म्हणजे भारतीय शेतकऱ्यांवर थेट हल्ला!— अजय बनकर (जाफराबाद तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष)

 



टेंभुर्णी प्रतिनिधी (जालना) विष्णु मगर

देशाचा शेतकरी आधीच महागाई, कर्जबाजारीपणा आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या प्रचंड ओझ्याखाली दबलेला आहे. बियाणे, खते, औषधे, डिझेल, वीज आणि मजुरीचे दर सातत्याने वाढत आहेत. मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. अशा कठीण परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या हितांऐवजी परदेशी कंपन्यांच्या फायद्यासाठी निर्णय घेणे अत्यंत चिंताजनक आहे. अमेरिकेसोबत केली जाणारी ही ट्रेड डील शेतकऱ्यांसाठी “विकासाची संधी” नसून, संकटाची घंटा आहे.ही डील लागू झाल्यास परदेशातून स्वस्त शेतीमाल भारतात येईल. त्यामुळे देशांतर्गत बाजारात भारतीय शेतमालाचे दर घसरणार असून त्याचा थेट फटका आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांना बसणार आहे.

भारतीय शेती हा केवळ व्यवसाय नसून, कोट्यवधी कुटुंबांची जीवनरेखा आहे. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे; त्याच्या घामातूनच देशाची भूक भागते. आज जर शेतकऱ्यांचे अस्तित्व धोक्यात आले, तर देशाची अन्नसुरक्षाही धोक्यात येईल. ही “ट्रेड डील” नाही, तर शेतकऱ्यांच्या कष्टांवर आणि स्वाभिमानावर घाला आहे. भारताचा शेतकरी विकाऊ नाही! तो स्वाभिमानी आहे, संघर्षशील आहे आणि देशाचा मजबूत आधारस्तंभ आहे.

शेतकऱ्यांच्या हितांशी तडजोड करणारी कोणतीही धोरणे आम्हाला मान्य नाहीत. सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवावे, किमान आधारभूत किमतीची (MSP) हमी द्यावी, स्थानिक उत्पादनाचे संरक्षण करावे आणि परकीय दबावापुढे झुकू नये.

शेतकरी मजबूत तरच देश मजबूत! शेतकरी वाचला तरच भारत वाचेल! या संदर्भात जाफराबाद तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अजय बनकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

१ एकर  Vs  ३०० एकर

विनातंत्रज्ञान  Vs  हाय-टेक तंत्रज्ञान

साधे बियाणे  Vs  GM हायब्रिड बियाणे

१८% कर  Vs  ०% कर

पावसावर अवलंबून  Vs  सिंचित शेती

गरीब  Vs  श्रीमंत

अशिक्षित  Vs  सुशिक्षित

इतकी असमानता असूनही भारतीय शेतकरी देशाचे पोट भरतो.

मात्र प्रश्न हा आहे — पोकळ आश्वासनांचा पाऊस या खोल संकटातून शेतकऱ्याला वाचवू शकेल का?

जोपर्यंत धोरणे शेतकऱ्यांच्या बाजूने नसतील,

तोपर्यंत घोषणा, जुमले आणि नारे हे केवळ फसवणूक ठरतील.

शेतकरी वाचला तर देश वाचेल!

जय जवान – जय किसान! 

 

No comments:

Post a Comment