बाळापुरचे होमगार्ड सार्जेट दिलेरसिंग ठाकूर यांच्या समय सुचकतेने हरविलेली 32 हजार रु. मालमत्ता असलेली बॅग शोधण्यास यश.
प्रतिनिधी गजानन चव्हाण
बाळापूर येथील जैन मंदिर येथे दर्शना करिता अहमदाबाद (गुजरात) येथून आलेले निमीतभाई हे २५ हजार रुपये किंमतीचा स्मार्ट फोन व ७ हजार रुपये किंमतीची स्मार्ट घडयाळ असलेली बॅग चुकुन ऑटो रिक्षा मध्ये विसरले होते. तेथेच जैन मंदिर येथे फिक्स पॉईंट वर बाळापूर होमगार्ड पथकातील सार्जेंट दिलेरसिंग ठाकूर स. क्र. 734 यांच्या जवळ निमितभाई गेले असता त्यांनी आपली सर्व हकीकत त्यांच्या जवळ सांगितली, ठाकूर यांनी क्षणाचाही विलंब न करता, आपले बाळापुर पथकातील पलटन नायक अब्दुल मोहसिन, सैनिक नदीम अन्सारी व हेड कॉन्स्टेबल रफीक खान यांना ही माहीती दिली, या सर्वांनी ताबडतोब चक्रे फिरवली व तो रिक्षा शोधून काढला, व मोबाईल व घडी असलेली बॅग निमितभाई यांच्या स्वाधीन केली, बाळापूर पथकातील होमगार्ड अधिकारी व सैनिकांच्या समय सुचकतेने व लगेच दाखविलेल्या तात्परतीने निमितभाई यांचा व 25 हजार रुपये असलेला मोबाईल व 7 हजार रु. असलेली घडी असलेली बॅग शोधण्यास मदत झाली,या त्यांच्या कामगीरीने लोकांचा होमगार्ड व पोलीसाप्रती विश्वास हा दृढ झाला आहे असे निमित भाई यांनी उदगार काढत सर्वांचे आभार मानले, होमगार्ड आपल्या ब्रीद वाक्य नुसार निष्काम सेवा करीत आपल्या इमाने,इतबारे कर्तव्य करीत असतात हे विशेष.या सर्व होमगार्ड व पोलीस बांधवाचे व विशेष करून सार्जेंट दिलेरसिंग ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment