श्री क्षेत्र संगोबा येथील श्री आदिनाथ महाराज मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भक्ताचा महासागर
करमाळा प्रतिनिधी :- जितेंद्र चांदगुडे
करमाळा शहरपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या सीना नदी काठावरील श्री क्षेत्र संगोबा येथील ऐतिहासिक अशा श्री आदिनाथ महाराज मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भक्ती भावाचा महासागर उसळला पहाटेच्या काकड आरतीपासून मंदिर परिसरात भाविकांची दर्शनसाठी रांग लागली होती. विद्युत रोषणाई, फुलांची आरस आणि पारंपारिक सजावटीने मंदिराचा परिसर उजळून निघाला होता.
गतवर्षीच्या दिवाळीच्या दरम्यान सीना नदीकडील पूर परिस्थितीचा सामना केलेल्या संगोबा भोवतालच्या खांबेवाडी, बोरगाव, पोटेगाव, तरटगाव, बिटरगाव (श्री) करंजे येथील शेतकरी वर्गासह करमाळा शहर व तालुक्यातील भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त कीर्तन भजन आणि हरिनाम सप्ताह सारखे विविध धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला. हर हर महादेवाच्या जयघोषात हजारो भाविकांभक्तानी दर्शन घेतले. यात्रा समितीकडून दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छतेची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत श्रीफळ, बेलपत्र, बेलफळ, हार-फुले, विभूती, गुलाल, बुक्का, चंदन अशा पूजेच्या वस्तूंसह प्रसादासाठी पेढे, खडीसाखर आणि विविध खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात लावण्यात आली आहेत. याशिवाय मनोरंजनासाठी लहान-मोठ्या पाळण्यांसह विविध खेळणी, नित्य उपयोगी वस्तूंच्या दुकानांमध्ये खरेदी सारखी ग्राहकांची झुंबड उडालेली दिसून येत आहे. मंदिराकडे जाणारे अरुंद रस्ते, नदीपात्रात पाणी असल्यामुळे वाहने लावण्यासाठी जागेची कमतरता आणि भाविकांच्या बेशिस्त पणामुळे वाहतूक विस्कळीत होत असली तरी वाहतूक पोलीसांनी भर उन्हात वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवली.पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी स्वतः मंदिराच्या आवारात थांबत गर्दी आणि विशिष्ट वर्तणुकीवर नियंत्रण ठेवले. तसेच देवस्थानाच्या आपत्कालीन मदत व प्रतिसाद कक्षाकडून समालोचन करत गर्दीला आवर घालण्याचे प्रयत्न दिवसभर सुरू होते. मंदिर परिसरात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रा मार्फत वैद्यकीय मदत कक्ष ही तप्तरतेने सुरू आहे.
.jpeg)
No comments:
Post a Comment