अनसिंग -वाशिम रस्त्याचे दुतर्फावर काटेरी झाडा झुडपाचे साम्राज्य
* अनसिंग * :- (ता.२८ ) अनसिंग - वाशिम महामार्गाचे दुतर्फावर सा.बां विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने महामार्गाचे दुतर्फावर काटेरी झाडाझुडपासह अन्य झुडपे उगवली असल्यामुळे दुचाकी वाहनासह इतरही वाहनांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सविस्तर माहिती अशी की, अनसिंग ही वाशिम तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून अनसिंगसह परिसरातील अनेक गांवखेडी आपल्या दैनंदिन कामानिमित्त जिल्हा कचेरीसह अन्य कामांसाठी अनसिंग - वाशिम या महामार्गाने वाशिम येथे ये - जा दुचाकी वाहनाने वेळेचा अपव्यय होवू नये म्हणून करतात.व वेळेचा अपव्यय होवू नये व कामे वेळेवर व्हावीत याकरीता शासनाने महामार्गाची निर्मिती व रूंदीकरणावर लाखो अब्जो रूपयांचा निधी खर्च करून महामार्गाची निर्मिती केली.परंतु संबंधित विभागाचे रस्ता देखरेखीवर अक्षम्य दुर्लक्ष असल्याने अनसिंग - वाशिम महामार्गाचे दुतर्फा बोरी, बाभळी,हिवर,रूई व अन्य झाडे झुडपे उगवून मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आली आहेत.संबंधित विभागाने यावर वेळीच उपाययोजना न केल्यास दुचाकीवरून प्रवास करणारे आपण वेळेत पोहोचलो पाहिजे या गर्तेत वाहन चालवित असताना अचानक समोरून अथवा मागून एखादे मोठे वाहन आल्यास त्याला बाजू देताना किंवा रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांचा प्रकाश डोळ्यांवर पडल्याने काही दिसेनासे होवून काटेरी झाडा झुडपाचा झपाटा लागून मोठा अपघात होवून मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी संबंधित विभागाने वेळीच दखल घेवून उपाययोजना कराव्या व वाहन चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.

No comments:
Post a Comment