करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीला कमळ घड्याळ शिट्टीला समसमान जागा
करमाळा प्रतिनिधी- जितेंद्र चांदगुडे
आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, गणेश चिवटे, रश्मी बागल-कोलते या नेत्यांचे समसमान उमेदवार निवडून आले आहेत. आ. नारायण पाटील जिल्हा परिषद दोन, पंचायत समिती चार, माजी आमदार संजयमामा शिंदे जिल्हा परिषद दोन, पंचायत समिती चार, गणेश चिवटे व रश्मी बागल जिल्हा परिषद दोन, पंचायत समिती चार उमेदवार विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादी जिल्हा परिषद 2, पंचायत समिती 4 व भाजप जिल्हा परिषद 2, पंचायत समिती 4 व क.वि.आ जिल्हा परिषद 2, पंचायत समिती 4 डाव बरोबरीत सुटला आहे.
जिल्हा परिषद विजयी उमेदवार
वीट गट आश्विनी चिवटे (भाजपा) पांडे गट रश्मी बागल (भाजपा) कोर्टी गट वनिता गुळवे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) चिखलठाण गट प्रशांत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) केम गट कल्याणी तळेकर ( ता. वि. आघाडी) वांगी गट रुपाली गोडसे (ता. वि. आघाडी)
पंचायत समिती विजयी उमेदवार
रावगाव गण संध्या कांबळे, वीट गण पूजा ढेरे कोर्टी गण नाना झाकणे, वांगी गण सोनाली ताकिक (सर्व भाजप) हिसरे गण भरत आवताडे, केतुर गण अजिनाथ विघ्ने, चिखलठाण गण वनमाला सरडे, साडे गण दशरथ घाडगे, (सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पांडे गण स्वप्नील काळे, उमरड गण आदिती पाटील, केम गण ज्ञानेश्वर बिचितकर, जेऊर गण ललिता शिरस्कर (तालुका विकास आघाडी)

No comments:
Post a Comment