माडग्याळ येथे ‘आरोग्य महाकॅम्प’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; २५० रुग्णांची मोफत तपासणी
प्रतिनिधी -मोहसिन इनामदार
माडग्याळ (ता. जत) : कुल्लोळी इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस आणि युथ फॉर जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोग्य महाकॅम्प’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महादेव मंदिर, माडग्याळ येथे पार पडलेल्या या शिबिरात सुमारे २५० रुग्णांची विविध आजारांवर मोफत तपासणी करण्यात आली. शिबिरात डॉ. गजानन रेपाळ (फिजिशियन), डॉ. वेदेश कुलकर्णी (नेत्ररोग तज्ञ), डॉ. प्रज्योत अपीने (सर्जन) तसेच डॉ. शीतल हुलवान (स्त्रीरोग तज्ञ) यांनी रुग्णांची तपासणी केली. नेत्ररोग विभागात ५५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. कुल्लोळी हॉस्पिटलकडून आणलेल्या अत्याधुनिक मोबाईल व्हॅनमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब व रेटिना तपासणीसारख्या सुविधा उपलब्ध झाल्या आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा लाभ झाला. शिबिरात तपासणी झालेल्या ऑपरेशन आवश्यक रुग्णांना कुल्लोळी हॉस्पिटलमार्फत सवलतीच्या दरात उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तसेच आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत विविध शस्त्रक्रिया व तपासण्या मोफत अथवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उपक्रमाच्या नियोजनात संजीवनी हॉस्पिटल, माडग्याळ चे डॉ. चंद्रमणी उमराणी, डॉ. स्मितांजली उमराणी तसेच त्यांचा स्टाफ श्री बसवराज नाटेकर श्री प्रशांत नाटेकर श्री किरण कांबळे श्री पिरप्पा कांबळे यांनी मोलाचे सहकार्य केले. शिबिरासाठी महादेव मंदिर संस्थेने जागा उपलब्ध करून दिली. माडग्याळचे सरपंच महादेव माळी यांनी सहकार्य केले. उद्घाटनप्रसंगी डॉक्टर शेखर हिट्टी साहेब डॉक्टर प्रदीप शिंदे आणि नेताजी खरात यांनी उपस्थिती दर्शवली. सूत्रसंचालन राजू कांबळे यांनी केले. डॉ. चंद्रमणी उमराणी यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट करताना ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हेच या उपक्रमामागील ध्येय असल्याचे सांगितले. शिबिराच्या यशस्वितेसाठी ज्ञात-अज्ञात नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल आयोजकांनी आभार व्यक्त केले. विशेष सहकार्य युथ फॉर जतचे श्री अमोल बामणे.श्री दिनेश शिंदे प्रमोद साळुंखे मोलाचे सहकार्य मिळाले

No comments:
Post a Comment