गणेश वसाहत येथे त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता संपन्न



(दैनिक दर्पण वृत्त प्रतिनिधी : पांडुरंग गायकवाड, )

वाळुंज येथील गणेश वसाहत परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाची आज अत्यंत भक्तिमय व भावपूर्ण वातावरणात सांगता संपन्न झाली. या सप्ताहाची सांगता ह.भ.प. श्री शरद महाराज बनसोडे यांच्या सुमधुर व प्रेरणादायी कीर्तन सेवेतून करण्यात आली.

गेल्या बारा वर्षांपासून गणेश जयंती अर्थात माघ शुद्ध चतुर्थी पासून सुरू होणारी ही अखंड सेवासाधना, ह.भ.प. शरद बाबा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सुरू असून, परिसरातील भाविकांसाठी हा सप्ताह म्हणजे भक्तीचा, श्रद्धेचा आणि संतविचारांचा दीपस्तंभ ठरत आहे.या सप्ताहादरम्यान तीन दिवस भक्तांना ज्ञानदान देण्याची अमूल्य सेवाह.भ.प. कृष्णा महाराज भवर, ह.भ.प. अभंग महाराज पठाडे, ह.भ.प. विनोदाचार्य, छगन महाराज खडके यांनी प्रभावीपणे पार पाडली.सप्ताहातील कार्यक्रमांची रूपरेषा अतिशय शिस्तबद्ध व भक्तिरसपूर्ण होती.

सकाळी पारायण, गणेशकथा, हरिपाठ आणि संध्याकाळी कीर्तन अशा भक्तीमय कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर नामस्मरणाने दुमदुमून गेला.गंगागिरी महाराज भजनी मंडळी यांनी हरिपाठ सेवा अत्यंत निष्ठेने पार पाडली. तसेच गायनाची सुरेल साथ देताना

कंठभूषण ह.भ.प. पांडुरंग महाराज बोरकर, रमेश शेळके महाराज, भरत महाराज, ह.भ.प. सोपान महाराज चव्हाण व इतर सर्व भजनी मंडळींनी नामगजरात रंगत आणली.या त्रिदिनी सप्ताहातून “नाम हेच परम साधन” हा संप्रदायाचा संदेश पुन्हा एकदा ठळकपणे भाविकांच्या मनावर उमटला. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विचारांची शिकवण जपत, एकता, सेवा, सदाचार आणि भक्ती यांचा मार्गच खरा जीवनमार्ग असल्याची प्रेरणा या सप्ताहाने दिली.

समारोप प्रसंगी भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. परिसरातील प्रत्येक घराघरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले असून, “जय हरी विठ्ठल” या नामघोषाने गणेश वसाहत अक्षरशः पावन झाली. या वेळी हभप. बाबासाहेब बनसोडे रा दत्त कॉलनी यांनी. 20 टाळ भजनी मंडळींना किर्तन भजन या साठी दान केले.. 

No comments:

Post a Comment