नांदखेडा ग्रामसंसद हादीत अवैध देशी विदेशी दारू विक्रीसाठी सक्त मनाई ग्रामसभेत ठराव पारीत....

 



टेंभुर्णी  प्रतिनिधी विष्णु मगर

जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील मौजे नांदखेडा ग्रामपंचायत अंतर्गत गावातील हद्दीमध्ये होत असलेली अवैध देशी, विदेशी दारू विक्रीसाठी परवानगी देण्यात मनाई करण्यात आली आहे . असा ठराव 26 जानेवारी रोजी ग्रामसभा घेण्यात आलेल्या ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे.

यावेळी गावकऱ्यांनी सरपंच , ग्रामसेवक यांनी गावचे पोलीस पाटील यांच्याकडे ठरावाची लेखी प्रत देऊन तक्रार केली. त्यावेळी लालदेव फाटा ते किन्ही गावातील दारूबंदी करावी यासाठी ग्रामसभेचा ठराव घेऊन नांदखेडा पोलीस पाटील स्वाती खरात,किन्ही पोलिस पाटील गणेश जायभाये, यांना निवेदन दिले. निवेदन देताना सुचक पंढरीनाथ म्हस्के मनसे तालुका सरचिटणीस जाफ्राबाद, अनुमोदक कल्याण सवडे अनुमोदक गणेश सवडे,उपस्थितीत, सरपंच बाबासाहेब सवडे, ग्रामविकास अधिकारी मदन डोईफोडे,दत्तात्रय सवडे,विलास सवडे,ग्रा.प.सदस्य,अरुण सवडे,सुभाष सवडे,ग्रा.प.सदस्य,राजू वाघ,ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर डिघोळे, शालेय समिती अध्यक्ष दिलीप गायकवाड,विठ्ठल सवडे शंकर माझाटे, बबन जजाळ,बाबासाहेब खरात,संतोष खरात, मारोती सवडे, रामेश्वर सवडे,रामकिसन सवडे,संजय हिवाळे ,मनोहर हिवाळे,संदीप हिवाळे,अविनाश सवडे,रुशीदर सवडे,दिपक माळी,आदी गावकरी उपस्थिती होती



No comments:

Post a Comment