अंध कलाकारांच्या सुरांनी महागावकरांची मने जिंकली
प्रतिनिधी : महागाव अक्षय डोंगरे
महागाव येथे अंध कलाकारांनी सादर केलेल्या सांगीतिक कार्यक्रमाने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. या कलाकारांनी भक्तीगीते, देशभक्तीपर गीते तसेच भीमगीते सादर करत उपस्थितांना एक वेगळाच अनुभव दिला.दृष्टी नसली तरी आत्मविश्वास, जिद्द आणि संगीतावर असलेले प्रभुत्व याच्या जोरावर या कलाकारांनी आपल्या सुरेल गायनाने कार्यक्रमाला वेगळीच उंची दिली. प्रत्येक गीतातून भावनांचा ओघ वाहत होता आणि रसिकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमादरम्यान सादर करण्यात आलेल्या भक्तीगीतांनी वातावरण भक्तिमय झाले, तर देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली. भीमगीतांच्या सादरीकरणाने सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.
हा प्रेरणादायी आणि समाजाला सकारात्मक संदेश देणारा कार्यक्रम रेणुका दिव्यांग संघ, सुर संगीताचा कलामंच, पुसद यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला महागाव व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
अंध कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून ‘अडचणी या यशाच्या वाटेतील पायऱ्या असतात’ हेच जणू स

No comments:
Post a Comment