नेवासा तालुक्यात धर्मजागृतीचा जागर: ५ हजार भाविकांच्या उपस्थितीत रंगला 'हनुमान चालीसा' सोहळा.
प्रतिनिधी नामदेव सरोदे
नजिक चिंचोली (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) येथे आज 3 जानेवारी 2026 वैष्णव सेवा आश्रम (बऱ्हाणपूर) यांच्या वतीने आयोजित 'भव्य फिरता हनुमान चालीसा सोहळा २०२६' अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ४० हून अधिक गावांतील 4 ते 5 हजार रामभक्त एकत्र आले होते आणि लवकरच हा आकडा १०० गावांच्या पार नेण्याचा संकल्प करण्यात आला.
या सोहळ्याला प.पू. स्वामी गुरुवर्य भारतानंदगीरी यांची वंदनीय उपस्थिती लाभली. तसेच विशेष उपस्थिती देवगड संस्थानचे प.पू.स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांची उपस्थिती लाभली .तसेच
ह .भ. प.गणेशानंद गिरी महाराज ( खड़ेश्वरी देवस्थान नजीक चिंचोली )
ह.भ.प. देविदासजी महाराज म्हस्के (संस्थान नेवासा)
ह.भ.प. दादा महाराज वायसळ (लखमापूर)
ह.भ.प. शिवानंदजी शास्त्री (चित्रकुटधाम पैठण)
ह.भ.प. साधी शितलताई देशमुख (बालमटाकळी)
ह.भ.प. दिपक महाराज उगले (पैठण)
ह भ प रमेशनंद गिरी महाराज (हंडीलिमगाव)
ह.भ.प. निलेशजी महाराज वाणी आणि इतर अनेक महाराज मंडळी उपस्थित होते .
या भव्य रॅलीत आणि सोहळ्यात बऱ्हाणपूर, आव्हाणे खु., अमरापूर, काळेगाव, साकेगाव, हनुमान टाकळी, लखमापूर, तेलकुडगाव, देडगाव, लाडे वस्ती शेवगाव, सामनगाव, हनुमानवाडी, मळेगाव, देवगाव, पिंपरी शहाली, कुकाणा, भेंडा, शिरसगाव, पाथरवाला, गोपाळपूर, दहिगाव-ने, तामसवाडी, हनुमाननगर, गेवराई, शिंदेवाडी पुणे, खामगाव, प्रवरासंगम, खातंपिंप्री, औरंगाबाद, शेकळे पवार वस्ती, वाघोली ,इत्यादी गावातील हनुमान चालीसा मंडळांनी सहभाग नोंदवला.
याप्रसंगी प.पू. गुरुवर्य भारतानंदगिरीजी महाराज (स्वामीजी, वेदांत साधना, लाडेवडगाव) यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना हिंदू धर्माचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सध्याच्या काळातील 'व्यावसायिक' कीर्तनकारांवर कडाडून टीका केली. महाराज म्हणाले की, "जुने संत आपला व्यवसाय सांभाळून धर्मप्रसाराचे निःशुल्क काम करायचे, त्यांनी कीर्तनाला कधीच व्यापाराचे साधन बनवले नाही. पण आज धर्माच्या नावाखाली अनेकजण कीर्तन-भजनाचा व्यवसाय करत आहेत, हे थांबले पाहिजे."
त्यांनी तरुणाईला व्यसनमुक्ती आणि मांसाहार वर्ज्य करण्याचा मोलाचा सल्ला दिला. हनुमान चालीसा केवळ पठण न करता ती आचरणात आणल्यास तरुणांचे जीवन सुसह्य होईल, असे ते म्हणाले.
कार्यक्रमासाठी मोफत मंडप सेवा मोरया साऊंड (आव्हाणे) आणि स्वागत सेवा समस्त महिला रामभक्त मंडळ (काळेगाव) यांच्या वतीने देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी हनुमान चालीसा व त्यानंतर पसायदान व हनुमानाची आरती करून कार्यक्रमाची सांगता झाली . उपस्थित सर्व भाविकांसाठी नजीक चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने 'महाप्रसादाचे' आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याने नजिक चिंचोली परिसरात भक्तीचे चैतन्य पसरवले असून सोमेश्वर महाराज(हनुमंत महाराज) यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
धर्म जागृतीचा हा जागर असाच अखंड सुरू राहो हीच हनुमंत राया चरणी प्रार्थना.
जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान
उमेश चावरे - हनुमान चालीसा भक्त नजिक चिंचोली

No comments:
Post a Comment