मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींचे विशेष कर्तव्य अधिकारी या पदावर अहिल्यानगर जिल्हाच्या प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे मॅडम यांची निवड
दर्पण न्यूज:- नेवासा प्रतिनिधी नाथाभाऊ शिंदे
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींचे विशेष कर्तव्य अधिकारी या पदावर अहिल्यानगर जिल्हाच्या प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल मोहटा देवस्थान समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रधान जिल्हा न्यायाधीश पदाबरोबरच असा पदभार सांभाळणाऱ्या श्रीमती शेंडे ह्या पहिल्याच न्यायाधीश आहेत.
प्रधान जिल्हा न्यायाधीशांकडून मोहटा देवी देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाची मुलाखती द्वारे निवड केली जाते. सध्या शाकंभरी नवरात्र उत्सव सुरू असून या कालावधीमध्ये देवीची पूजा, महाप्रसाद सेवा, कुमकुम अर्चन सेवा, होम हवन, सुवासिनी भोजन अशा सेवा महत्त्वाच्या मानल्या जातात. श्रीमती शेंडे यांनी कुमकुम अर्चन सेवा करत महापूजा केली. उपस्थित विश्वस्त व देवस्थान समितीच्या प्रशासनाबरोबर बैठकीदरम्यान चर्चा करत विविध कामांंबाबत मार्गदर्शनही केले. यावेळी विश्वस्त मंडळा पैकी ऍड. विक्रम वाडेकर, ऍड. प्रसन्न दराडे, बाबासाहेब दहिफळे, अशोक दहिफळे, श्रीकांत लाहोटी हे विश्वस्त तर मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे मुख्य लेखापाल संदीप घुले उपस्थित होते. देवस्थान समितीतर्फे कोट्यवधी रुपये खर्च करून विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत. धार्मिक व निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील प्रमुख क्षेत्रांपैकी मोहटा देवस्थान क्षेत्राची आता सर्वत्र ओळख झाली आहे. अत्यंत जागृत व नवसाला पावणारी देवी म्हणून देवस्थानची ख्याती असल्याने भाविकांची संख्या वाढत आहे. देवस्थान समितीला भेट देणारा भाविक प्रसन्नचित्त होऊन जातो. मंदिराची स्वच्छता, शांतता व पावित्र्य प्रत्येकाच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.

No comments:
Post a Comment