आदर्श विद्या मंदीर,सोनई येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न.
दर्पण न्यूज (नेवासा) प्रतिनिधी - नवनाथ घावटे
आदर्श माध्यमिक विद्यालय सोनई येथे माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात येवून विद्यार्थ्यी स्नेह मेळावा उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक श्री खेसमाळसकर सर होते.
यावेळी बोलताना माजी मुख्याध्यापक खेसमाळसकर सर म्हणाले की, माजी-विद्यार्थी संघाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली तीच्या माध्यमातून शाळेत संस्था व शाळा परवानगीने विद्यार्थ्यांच्या सुप्तावस्थेतील कलागुणांना वाव मिळावा, इतरही उपक्रम हाती घेण्यात यावे त्या साठी विचारांची बैठक घेऊन वैचारिक धनांची देवाणघेवाण होईल.चांगले ऊपक्रम हाती घेऊन गरीब ,गरजु विद्यार्थी ची ज्ञानाची भूक भागविण्यासाठी निश्चित उपयोग होईल.
कार्यक्रमासाठी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष देविदास शेटे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे,मुख्याध्यापक श्री फोपसे सर, श्री पवार सर, श्री दराडे सर, श्री दरंदले सर व इतर सर्व शिक्षक, माजी विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन श्री जमीर शेख यांनी केले तर आभार श्री डॉ.संकेत दरंदले यांनी मानले.

No comments:
Post a Comment