नेवासा बुद्रुक येथील मंदिरात खंडोबा-म्हाळसा विवाह साजरा




दर्पण न्यूज:- नेवासा प्रतिनिधी नाथाभाऊ शिंदे पाटील 

श्री खंडोबादेवाची सासुरवाडी व म्हाळसा देवीचे माहेरघर असलेल्या नेवासा बुद्रुक येथील पुरातन श्री खंडोबा म्हाळसा बानाई मंदिरात 'येळकोट येळकोट जय मल्हार' असा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण करत श्री खंडोबा म्हाळसादेवीचा विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने दि. २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता खंडोबा म्हाळसा यांचा हळदी समारंभ करण्यात आला. नेवाशाचे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले व डॉ. वैशाली घुले, खंडोबाची वाकडी येथील सेवेकरी गोरक्षनाथ साबदे, पुजारी संजय घोडके, सावळेराम आहेर, ज्ञानेश्वर कोते यांनी सपत्नीक येऊन म्हाळसा देवीला हळद लावून पूजन केले. पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर शनिवारी दुपारी १२ वाजता म्हाळसादेवी व खंडोबादेवाचा हा विवाह सोहळा साजरा करण्यातआला.

पुरातन म्हाळसा खंडोबा बाणाई मंदिराचे संभाजी ठाणगे व संगिता ठाणगे यांच्या हस्ते खंडोबादेवाच्या उत्सव मूर्तीचे व म्हाळसादेवी च्या मुखवट्याचे मुंडावळी घालून पूजन करण्यात आले. अश्विनी रहाट, स्वाती रहाट यांनी सुवासिनींचे हळदी कुंकू लावून स्वागत केले. ग्राम पुरोहित लाला जोशी व मार्तंड वारुळे यांनी पौरोहित्य केले.

पौर्णिमेला म्हाळसा मातेचा शुभ विवाह पाली येथे साजरा होतो. नेवासा बुद्रुक येथे म्हाळसामातेचा जन्म झाला असल्याने याच क्षेत्री विवाह सोहळा साजरा करण्याची परंपरा सुरू करण्यात आली असल्याचे सांगून हा विवाह सोहळा आता दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येईल असे संभाजी ठाणगे यांनी सांगीतले.

याप्रसंगी साधनाताई मुळे, अॅड. संजय सुखदान, असिफ पठाण, अनिल शिंदे, निरंजन डहाळे, संभाजी धोत्रे, जालिंदर गवळी, शांतवन खंडागळे, राजेंद्र काशीद, बालू फसले, लक्ष्मण फसले, शांताराम बोर्डे, गणेश मंडलिक सुनील बोरुडे, लखन धोत्रे, ज्ञानेश्वर गायकवाड, धनू कुटे, दिलीप गायकवाड, संजय गायकवाड, मनोज कपिले, सागर कदम, गणेश क्षीरसागर, चंदू पवार, रविंद्र थावरे, चंद्रकांत पवार, विठ्ठल पवार, राजेंद्र थावरे, कचरू काळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment