वाळुंज गटात अपक्ष “महिला शक्ती”चा बिगुल! सौ. पूजा योगेश नाडे मैदानात, तरुणांचा प्रचंड पाठिंबा



वाळुंज | प्रतिनिधी  पांडुरंग गायकवाड 

वाळुंज जिल्हा परिषद गटात अखेर महिला नेतृत्वाचा निर्णायक उदय पाहायला मिळत आहे. सौ. पूजा योगेश नाडे यांनी संपूर्ण ताकदीनिशी गटातील व गणातील सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निवडणूक रिंगणात भक्कम पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे, पक्षीय राजकारणाच्या कात्रीत अडकलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, या भावनेतून सौ. पूजा ताई यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर केली आहे.

भाजपमध्ये काम, पण उमेदवारी डावलली? कार्यकर्त्यांमध्ये संताप

सौ. पूजा ताई मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यरत होत्या. त्यांनी पक्षासाठी गेल्या काही महिन्यांत असा उत्कृष्ट कामाचा झंझावात निर्माण केला की, “हे काम कोणालाही जमलं नाही” असे अनेक कार्यकर्त्यांकडून खुलेपणाने बोलले जात आहे.

गावोगावी संपर्क, मतदारांशी थेट संवाद, संघटन उभारणी, जनतेच्या समस्या समजून घेणे — या सगळ्या आघाड्यांवर पूजा ताईंची मेहनत सर्वांनाच भावली होती.

मात्र ऐन शेवटच्या क्षणी पक्षाने उमेदवारीतून त्यांना डावलल्याची चर्चा सुरू होताच कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

“महिला चालत नाही?” प्रश्नांमुळे वातावरण तापलं

मतदार बंधूंकडून आता उघडपणे प्रश्न विचारले जात आहेत की,

“तुम्ही महिला आहात म्हणून उमेदवारी डावलली का?”

जर महिला उमेदवार ‘चालत नाही’ असे कोणाला वाटत असेल, तर मग या देशाच्या राष्ट्रपतीदेखील महिला आहेत, हे विसरायचे का?

असा थेट सवाल जनता करत असून, वाळुंज गटात महिलाशक्तीला दुय्यम वागणूक मिळाल्याची भावना जोर धरत आहे.

अपक्ष म्हणून प्रचाराचा दणका! आज 24 रोजी प्रचाराला सुरुवात

या पार्श्वभूमीवर गटातील गणातील मतदारांचा विचार घेऊन आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून सौ. पूजा ताई योगेश नाडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.

आज दिनांक 24 रोजी त्यांनी आपल्या प्रचाराला अधिकृत सुरुवात केली असून वाळुंज परिसरात राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

तरुणाईचा प्रखर पाठिंबा, निवडणूक रंगणार!

सौ. पूजा ताईंच्या मागे मोठा तरुण वर्ग प्रखरपणे उभा असल्याचे चित्र दिसत आहे. प्रचाराला सुरुवात होताच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, “ही निवडणूक आता एकतर्फी राहणार नाही” असा सूर अनेकांमध्ये व्यक्त होत आहे.

वाळुंज गटात मोठी चुरस अटळ

एकीकडे पक्षीय समीकरणे आणि दुसरीकडे जनतेचा प्रखर आवाज — या दोन्हीच्या संघर्षातून वाळुंज गटातील निवडणूक अधिकच चुरशीची आणि निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

आता पाहायचे इतकेच की, महिला उमेदवाराला न्याय देण्यासाठी वाळुंजची जनता कोणता कौल देते! 


No comments:

Post a Comment