वैजापूर पंचायत समिती घरकुल लाभार्थ्यांचा मनस्ताप
प्रतिनिधी गहिनीनाथ वाघ
वैजापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे काम सुरू आहे ही योजना खऱ्या अर्थाने बेघर नागरिकांना घर उपलब्ध होण्यासाठी आहे परंतु वैजापूर तालुक्यामध्ये ज्यांच्याकडे पक्के घर आहे अशांना लाभ दिला जात आहे व ज्यांना आवश्यकता आहे त्यांना लाभापासून वंचित ठेवला जात आहे तालुक्यामध्ये अभियंताचे वेगवेगळे एजंट्स आहे एजंटच्या माध्यमातून हे पैसे गोळा करतात आणि अभियंत्यांना देतात त्यांचीच कामे घरकुल विभागाकडून केली जातात परंतु ज्या लाभार्थ्यांचे पहिला हप्ता 15 हजार रुपये मिळत असतो अशा काही लाभार्थ्यांचे नावे आधार कार्ड बँक पासबुक या कारणामुळे रद्द झालेली असतात परंतु कागदपत्रे देऊनही दोन-चार महिने ही उलटून जातात तरीही लाभार्थ्याच्या खात्यात पैसे येत नाही गटविकास अधिकारी यांना विचारणा केली असता येतील म्हणून सांगितले जाते वैजापूर मधील घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते वैभव मतसागर हे टाकतात यांना विचारणा केली असता काही ऑनलाइन अडचणी आहे तसेच डिव्हिजन ऑनलाईन समस्या असू शकतात म्हणून लाभ मिळण्यास वेळ लागत आहे असे सांगितले जाते.
परंतु डिव्हिजन ऑफिसला अधिकारी सुदेश रोकडे यांना विचारणा केली असता आमच्याकडून सर्व लाभार्थ्यांना लाभ किंवा ऑनलाईन सर्व कामे सुरळीत झाली असून ज्या लाभार्थ्यांना पहिला हप्त्याचा लाभ मिळाला नाही अशा लाभार्थ्यांना वैजापूर पंचायत समिती मध्ये मागणी करावी लागेल किंवा घरकुल विभागात चौकशी करावी असे डिव्हिजन अधिकारी सुदेश रोकडे यांनी सांगितले परंतु याकडे वैजापूर प्रभारी गटविकास अधिकारी सुहाष वाघचौरे याची चौकशी करतील कि लाभार्थ्यांना लटकत्या तलवारीचा सामना करावा लागेल असा प्रश्न लाभार्थ्यांसमोर उभा आहे की हे सर्व अधिकारी मिळून लाभार्थ्यांना उडवाउडवीचे उत्तरे देत आहे असे म्हणावे लागेल या सर्व प्रकरणाची सखोल माहिती जिल्हा ग्रामीण यंत्रणाचे संचालक अशोक सिरसे यांनी करावी व कामचुकार अधिकारी व उडवा उडवी चे उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे नागरिकांकडून प्रतिक्रिया मिळत आहे

No comments:
Post a Comment