वाळूज लांजी टी पॉइंटवर राष्ट्रवादीच्या प्रचाराची रणशिंग फुंकली! हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचार कार्यालयाचे दणदणीत उद्घाटन !!
वाळुंज महानगर प्रति. पांडुरंग गायकवाड.
वाळूज येथील लांजी टी पॉइंट जवळ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचाराला मोठी गती मिळाली असून पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते जिल्हा परिषद – पंचायत समिती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
आज सकाळी १०:३० वाजता पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी प्रचंड संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या जोरदार प्रतिसादामुळे परिसरात जनसमर्थनाची लाट स्पष्ट दिसून आली.
वाळुंज गटातून बालाजी सोनटक्के मैदानात – महिलाशक्तीचे दोन दमदार चेहरेही रिंगणात!
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेच्या विश्वासावर आणि ताकदीवर उभे राहत सुशिक्षित, कार्यक्षम आणि लोकांमध्ये काम करणारे उमेदवार मैदानात उतरवले आहेत.
✅ वाळुंज गट (SC प्रवर्ग) – श्री बालाजी रघुनाथ सोनटक्के
✅ गणा पंचायत समिती गट (वाळुंज – OBC महिला) – सौ. अनिता लक्ष्मण राऊत
✅ पंचायत समिती लिंबे-जळगाव गट – सौ. संगीता नारायण चनघटे
जनतेचा भक्कम जनाधार घेऊन हे तिन्ही उमेदवार विजयासाठी सज्ज झाले असून वाळूज परिसरातील मतदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांबाबत प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
“राष्ट्रवादी म्हणजे शाहू–फुले–आंबेडकर विचारांची ताकद… येथे जातीभेदाला जागा नाही!” – सतीश चव्हाण
यावेळी आमदार सतीश चव्हाण यांनी भाषणात स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. या पक्षात कोणताही जातीभेद नाही. आम्ही जनतेला बालाजी सोनटक्केसारखा सुशिक्षित, सजग आणि अहोरात्र झटणारा उमेदवार दिला आहे. तसेच दोन महिला उमेदवार मैदानात उतरवून महिलांना नेतृत्वाची संधी दिली आहे.”
पुढे त्यांनी उपस्थितांना आवाहन करत सांगितले की,
“तिन्ही उमेदवारांना घड्याळ या चिन्हावर मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करा!”
कार्यकर्त्यांचा प्रचंड सहभाग – राष्ट्रवादीचा एकजुटीचा शक्तिप्रदर्शन
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये दिलीप पाटील बनकर, काकासाहेब पाटील चाफे, सचिन मुंडे, देवडे पाटील, दळे पाटील, शरद महाराज बनसोडे, नारायणपूरचे सरपंच नाशिर पटेल, ग्रामपंचायत सदस्य नदीम झुंबराला, नंदू सोनवणे, रत्नांबिलवादे, संजय काजळे, लक्ष्मणराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यकर्त्यांचा जोश, घोषणांनी भारलेले वातावरण आणि उमेदवारांना मिळणारा जनसाथ पाहता वाळूज परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

No comments:
Post a Comment