महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी पारंपरिक पद्धतीने श्रीफळ वाढवून व शक्ती प्रदर्शन करत जोरदार प्रचाराचा नारळ फोडला

 


येणेगुर जिल्हा परिषद गट व येणेगुर व तुगाव पंचायत समिती गणात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 27/01/2026 रोजी येणेगुर व तुगाव येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी पारंपरिक पद्धतीने श्रीफळ वाढवून व शक्ती प्रदर्शन करत जोरदार प्रचाराचा नारळ फोडला गावांमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधत उमेदवारांनी ग्रामविकास आणि स्थानिक प्रश्नांवर भर देत प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक येणेगुर जिल्हा परिषद गट महाविकास आघाडीचे आरती अशोक जाधव, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तुगाव पंचायत समिती अश्विनी विष्णू मुसळे, व येणेगुर पंचायत समिती लता संतोष कलशेट्टी यांच्या प्रचाराचा नारळ उत्साहात फुटला या शुभप्रसंगी उमरगा तालुक्याचे लाडके आमदार प्रवीण स्वामी गुरुजी उ बा ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते, बाबा उर्फ केशव पाटील, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, विजयकुमार दळगडे, विकास भाऊ हाराळकर , सुधाकर पाटील,बाबा मस्के, व इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती 

तुगाव व येणेगुर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या चुरशीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुगाव व येणेगुर येथे दि ,27/01/2026 रोजी महाविकास आघाडीचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार यांनी गावच्या ग्राम दैवताचे दर्शन घेऊन व श्रीफळ वाढवून प्रचाराचा नारळ फोडला. या प्रसंगी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. 

उमेदवाराने आपल्या प्रचाराचा शुभारंभ करत जनतेच्या समस्या बाबत आपण ही निवडणूक लढवत असून, विकासकामांचा वारसा पुढे चालवण्यासाठी जनता आपल्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी घरोघरी जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधत मतदारांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. 

गावातील प्रमुख नेते, महिला वर्ग आणि तरुणांच्या उपस्थितीत झालेल्या या शुभारंभप्रसंगी विकासाच्या मुद्द्यावर भर देण्यात आला. या निवडणुकीत प्रामुख्याने रस्ते, पाणी, शिक्षण हे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या उत्साही प्रारंभी मुळे येणेगुर पंचायत समिती गण व तुगाव पंचायत समिती गण परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे


No comments:

Post a Comment