मा. जिल्हाधिकारी साहेब आनंद भंडारी यांच्या प्रेरणेतून साकारले 'ज्ञानसाधना' वाचनालय--जि.प प्राथ.शाळा वडाळा बहिरोबा.



26 जानेवारी 2026 रोजी जि.प.प्राथ शाळा वडाळा बहिरोबा शाळेमध्ये श्री. बाबासाहेब सुधाकर मोटे उपसरपंच वडाळा बहिरोबा तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विकास कौसराम होंडे. यांच्या हस्ते 'ज्ञानसाधना वाचनालयाचे'उद्‌घाटन करण्यात आले.

यावेळी श्री. ललित भाऊ मोटे सरपंच वडाळा बहिरोबा. माजी उपसरपंच श्री. सचिन मोटे, श्री.बी. डी. मोटे, श्री. भाऊसाहेब शिंदे. ग्रामसेवक वडाळा बहिरोबा, माजी मुख्या. श्री.गायकवाड सर तसेच इतर मान्यवर ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. मा आनंद भंडारी साहेब जिल्हाधिकारी यांचा वाचन उपक्रम लक्षात घेऊन, त्यांच्या प्रेरणेतून वाचनालय साकारण्यात आले. वाचनामुळे मुलांची विचारशक्ती विकसित होते, भाषा समृद्ध होते, सर्जनशीलता, शब्दसंपत्ती वाढते, चांगली पुस्तके सकारात्मक विचाराकडे नेतात. वाचन ही समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली आहे. सध्या मोबाइलच्या अतिवापरामुळे विद्यार्थी वाचनापासून दुरावत चालली आहेत . या सर्व बाबी लक्षात घेउनविद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी. त्यांची मने सुस्कांरीत व्हावी. यासाठी वडाळा शाळेचे मुख्या. आदरणीय पाथरकर सर, सर्व शिक्षक वृंद, विदयार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्या परिश्रमातून व सहकार्यातून ' ज्ञानसाधना' वाचनालय उभे करण्यात आले.

 20000 रुपायांची पुस्तके लोकसहभागातून मिळवण्यात आली. श्री. ललित भाऊ मोटे सरपंच वडाळा बहिरोबा, श्री बाबासाहेब सुधाकर मोटे माजी उपसरपंच वडाळा बहिरोबा, श्री. विकास कौसराम होंडे १ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,माजी मुख्या श्री. गायकवाड सर श्री.रविंद्र प्रकाश मोटे, मोटे,श्री.वैभव खिळदकर, श्री. पोपट रावसाहेब मोटे,श्री.ज्ञानेश्वर अंजाबापू कर्डिले, श्री जयवंत मोटे, श्री.अनिल भानुदास राउत, श्री. सुनिल जालिंदर राउत या सर्व मान्यवरांनी शालेय वाचनालयास आर्थिक सहाय्य केले. तसेच श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवा संघ वडाळा बहिरोबा यांनी 2500 रु.ची स्वामी विवेकानंद यांची पुस्तके तसेच श्री. वसंत कुऱ्हे यांनी 100 पुस्तके वाचनालया साठी दिली. उत्साही व सकारात्मक वातावरणात ' ज्ञानसाधना' वाचनालयाचे उद्‌घाटन पार पडले. सदर कार्यक्रमास मॉर्निंग गृपचे कार्यकर्ते श्री. राहुल मोटे, श्री.महेश मोटे श्री.उबाळे सर,अमोल पवार सर शाळेमध्ये उपस्थित होते. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मॉर्निंग गृप यांनी शालेय परिसराची स्वच्छता जे. सी.पी द्वारे करून दिली. त्यामुळे शाळेचे वातावरण स्वच्छ, प्रसन्न झाले.

कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सदस्य, सर्वग्रामस्थ, पालक, माता भगिनी उपस्थित होत्या.


No comments:

Post a Comment