आयडीयल इंग्लिश स्कूल, शेख हुसेन काझी इंग्लिश हायस्कुल अँड ज्यू. कॉलेज येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न



संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)

आयडीयल इंग्लिश स्कूल, शेख हुसेन काझी इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, महाड- रायगड येथे २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८:१५ वाजता मान्यवर प्रमुख पाहुणे मा. वजीरभाई कोंडीवकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी व्यासपीठावर फरहा कोंडीवकर, फहीम कोंडीवकर, प्राचार्य संभाजीराव सूर्यवंशी, मुख्याध्यापिका वर्षा मालुसरे, नगरसेवक डॉ. हवा पानसरी,  नजीर पठाण, एजाज पानसरी, इक्बाल शेख, नजीर पोर्ट्रिक, रिहाना सोलकर, नबिला कादरी, तसेच पालक-शिक्षक संघाचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत व देशभक्तीपर गीतांचे गायन करण्यात आले. सर्व उपस्थितांनी अभिमानाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. शाळेचा परिसर तिरंगी पताका, फुगे व आकर्षक सजावटीने सजवण्यात आला होता.

यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, गीते, देशभक्तीपर कृती व लघुनाट्य सादर करून एकता, स्वातंत्र्य व नागरिकांची कर्तव्ये यांचा संदेश दिला. 

शाळेचे प्राचार्य संभाजीराव सूर्यवंशी यांनी भाषणात भारतीय संविधानाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन केले. त्याचबरोबर प्राचार्य संभाजीराव सूर्यवंशी यांनी उपस्थित मान्यवर, पालक आणि  विद्यार्थ्यांना दहावी बारावी बोर्ड परीक्षा स्वच्छ, भयमुक्त, तणावमुक्त वातावरणात व्हाव्यात म्हणून कॉपीमुक्त अभियाना अंतर्गत शपथ घेऊन जनजागृती केली. 

याप्रसंगी वजीरभाई कोंडिवकर, फरहा कोंडिवकर तसेच इतर मान्यवरांनीही विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.

संपूर्ण कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये देशाभिमान व राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण झाली. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संस्मरणीय व प्रेरणादायी ठरला.


No comments:

Post a Comment