वजीरभाई कोंडीवकर यांचा सत्कार

 



संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)

महाड : येथील आयडीयल इंग्लिश स्कूल, शेख हुसेन काझी इंग्लिश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, महाड- रायगड या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, मा. वजीरभाई कोंडीवकर यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. श्रीमान वजीरभाई कोंडीवकर हे महाड नगरपरिषदेत सलग दुसऱ्यांदा भारी बहुमताने नगरसेवक (कॉर्पोरेटर) म्हणून निवडून आले आहेत. तसेच नुकतीच  त्यांची महाड नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापती पदी सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेमार्फत त्यांचा गौरव करण्यात आला.

या प्रसंगी शाळेचे प्राचार्य  संभाजीराव सूर्यवंशी व मुख्याध्यापिका वर्षा मालुसरे यांच्या हस्ते मान्यवर, विद्यार्थी, पालकवर्ग यांच्या विशेष उपस्थितीत मा. वजीरभाई कोंडीवकर यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या समारंभास व्यासपीठावर व सभागृहात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. 


सत्कारमूर्ती कोंडीवकर यांनी यापूर्वी महाडचे उपनगराध्यक्ष, आरोग्य आणि शिक्षण समिती सभापती म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी महाड शहर कचराकुंडीमुक्त केले हे सर्वश्रुत आहे. यावेळेस त्यांना पाणी पुरवठा समिती सभापती म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. 


मा. कोंडीवकर यांच्या या यशामुळे संपूर्ण शाळा, विद्यार्थी, शिक्षकवर्ग व संस्थेला अभिमान वाटत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी उपस्थितांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.


No comments:

Post a Comment