कोठुरे येथे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत गृहप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न
प्रतिनिधी. गणेश ठाकरे लासलगाव दि.२६
ग्रामपंचायत कोठुरे, ता. निफाड येथे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत सन २०२४–२५ मधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांचा गृहप्रवेश सोहळा आज दिनांक २६/०१/२०२६ रोजी सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला.
हा गृहप्रवेश सोहळा आमदार दिलीप काका बनकर यांच्या शुभहस्ते तर राजेंद्र सदाशिव डोखळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. गटविकास अधिकारी श्रीमती नम्रता जगताप, मा. सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. सुनील पाटील उपस्थित होते.
कोठुरे येथे एकूण १२९ घरकुले मंजूर असून त्यापैकी ८७ घरकुले पूर्ण झाली आहेत, तर उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. कार्यक्रमप्रसंगी मा. आमदार दिलीप काका बनकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांचा गृहप्रवेश करण्यात येऊन त्यांना घराची चावी व घर बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओमकार पवार यांच्या प्रेरणेतून साकार झालेल्या “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयाचे” उद्घाटनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास विस्तार अधिकारी (ग्रा.प.) श्री. संजय पवार, श्री. राजेश थोरात, श्री. बोरसे, कनिष्ठ अभियंता श्रीमती ललवाणी, सरपंच सौ. सरला उत्तम बुटे, उपसरपंच सौ. ज्योती बाळू पवार, सौ. जयश्री मोगल, नवनाथ मोगल, मच्छिंद्र कोकाटे, बाळू बेंडकुळे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती आरती दिघे, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत कोठुरेच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.

No comments:
Post a Comment