'अरुणोदय' सिकलसेल अॅनिमिया विशेष मोहीम
महागाव प्रतिनिधी अक्षय डोंगरे
महागाव काळी दौ..ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र काळी दौ.यांच्या संयुक्त विद्यमाने गावात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील २१ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये दिनांक १५ जानेवारी ते ७फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'अरुणोदय' सिकलसेल अॅनिमिया विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
यामधे नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी तसेच sickel cell तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले. या आरोग्य शिबिरामध्ये प्रमुख उपस्थितीती सरपंच सौ. निशाताई संतोष राठोड होत्या. ग्रामपंचायत सचिव विनोद चव्हाण, तसेच आरोग्य तपासणी डॉ. शितल पवार (आडे) व डॉ. अनामिका सरकटे (डोंगरे), अश्विनी मगर (sickel cell co ordinator) यांच्या मार्फत झाली ,तसेच उपसरपंच सौ. सविता पठाडे,ग्रामपंचायत सदस्य
सिंधुताई आगोसे, सैय्यद इरफान, रमेश ढगे, आशिष बोके, सुशील रणवीर, देवानंद आंबोरे, दत्ता बेले, किसन आढाव, सुदेश नरवाडे, गजानन राठोड, सुखदेव देवकर, सोपान राठोड,आरोग्य सहाय्यक रनमलेआदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment