दर्पण वृत्तपत्राच्या माध्यमातून महागावातील प्रत्येक वार्डातील समस्या मांडणार प्रतिनिधी अक्षय डोंगरे यांचा पुढाकार
प्रतिनिधी अक्षय डोंगरे
महागाव शहरातील प्रत्येक वार्डातील सामान्य जनतेच्या समस्या आता थेट व्यासपीठावर येणार असून दर्पण वृत्तपत्राच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा निर्धार प्रतिनिधी अक्षय डोंगरे यांनी व्यक्त केला आहे. शहरातील नागरी प्रश्न मूलभूत सुविधांचा अभाव प्रशासकीय दिरंगाई आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी आता दडपल्या जाणार नाहीत असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
महागाव शहरातील अनेक वॉर्डांमध्ये सांडपाण्याच्या तुंबलेल्या नाल्या खराब रस्ते अपुरा पाणीपुरवठा कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा स्ट्रीट लाईट बंद आरोग्य सुविधांचा अभाव तसेच नगरपंचायत प्रशासनाची उदासीनता अशा समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. मात्र या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची तयारी कुणीही दाखवत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दर्पण वृत्तपत्र हे केवळ बातम्यांचे माध्यम नसून सामान्य माणसाचा आरसा आहे असे सांगत अक्षय डोंगरे म्हणाले की महागावातील प्रत्येक वार्डातील नागरिकांनी आपले प्रश्न तक्रारी अन्याय आणि दुर्लक्षाची प्रकरणे निर्धास्तपणे आमच्यापर्यंत पोहोचवावीत. दर्पण वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या समस्या प्रसिद्ध करून प्रशासन व लोकप्रतिनिधींना जाब विचारला जाईल.
शहरातील सामान्य नागरिकांना थेट बोलण्याची संधी मिळावी त्यांचे प्रश्न कागदावरच नव्हे तर व्यवस्थेच्या कानावरही पडावेत यासाठी प्रत्येक वार्डातील समस्या स्वतंत्रपणे मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाणी स्वच्छता, आरोग्य, शिक्षण रस्ते वीज अतिक्रमण, भ्रष्टाचार निधीचा गैरवापर अशा सर्व विषयांवर दर्पण वृत्तपत्र ठाम भूमिका घेणार आहे.
आज जनतेचे प्रश्न दाबले जात आहेत आवाज दडपला जात आहे. पण आता तसे होणार नाही. दर्पण वृत्तपत्र सामान्य जनतेचा आवाज बनेल असे ठाम मत व्यक्त करत अक्षय डोंगरे यांनी महागाव शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की आपल्या वार्डातील समस्या फोटो माहिती आणि पुरावे घेऊन संपर्क साधावा.
महागावमधील प्रत्येक वार्डातील प्रश्न जर एकत्रितपणे समोर आले तर प्रशासनालाही दुर्लक्ष करता येणार नाही असा विश्वास व्यक्त होत असून या उपक्रमामुळे शहरातील रखडलेल्या प्रश्नांना गती मिळेल अशा प्रकारची अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment