१५ व्या वित्त आयोगातून विविध विकास कामे मार्गी लागणार नगरपंचायत हद्दीत प्रभाग ११ विविध विकासकामांचा उत्साहात शुभारंभ
•महागाव प्रतिनिधी अक्षय डोंगरे
महागाव, ता. १० : नगरपंचायत हद्दीत १५ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीतून विविध विकासकामांना गती मिळाली असून, नगरपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वपूर्ण कामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने ही विकासकामे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. या विकासकामांसाठी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे तसेच अभियंता माधवराव पाटील यांनी अखंड, नियोजनबद्ध व अथक परिश्रम घेतले. त्यांच्या प्रशासकीय व तांत्रिक मार्गदर्शनामुळेच ही कामे प्रत्यक्षात येऊ शकली. याशिवाय या सर्व कामांसाठी श्रीकांत लीगदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून संभाजी दादा नरवाडे, भगवानराव पाटील, देविदास गावंडे, प्रा. शरदचंद्र डोंगरे .दिगंबर गाडबैले,यांची उपस्थिती लाभली. तसेच नगरसेवक परवेज सुरैया, गजाननसाबळे, ,नारायण शिरबिडे .विशाल पांडे .

No comments:
Post a Comment