वाळुंज बजाज झेडपी गेट या ठिकाणी एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न कामगारांचा मोठा सहभाग



.(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड)

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग (दिशा), जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्था (MGVS), स्थलांतरित कामगार प्रकल्प,छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज झेपी गेट येथे एचआयव्ही, एड्स, गुप्तरोग तसेच निरोध वापराविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती साधना गंगावणे, यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

या उपक्रमात लोकजागृती बहुउद्देशीय सांस्कृतिक कला सेवाभावी संस्था, शाहिर रामदास धुमाळ, शाहिर सुमित धुमाळ व संच यांनी मनोरंजनातून प्रबोधन करणारा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित कंपनी कामगारांना एचआयव्ही, एड्स, गुप्तरोगांचे प्रतिबंध, सुरक्षित लैंगिक वर्तन आणि निरोधाच्या वापराबाबत सुलभ व प्रभावी पद्धतीने माहिती देण्यात आली.

बजाज झेपी गेट येथे ५० कंपनी कामगार, झेडपी गेट येथे ५० इतर कामगारांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. उपस्थितांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्रकल्प समन्वयक सुनिता नव्हाथे, समुपदेशक ऋषिका ढेंबरे, हेल्थ एज्युकेटर संजना लहाने यांनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमामुळे कामगारांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली असून, सुरक्षिततेविषयी सकारात्मक संदेश देण्यात यश आले 

No comments:

Post a Comment