निफाड तालुक्यात एकल महिला सन्मान , हळदी कुंकू कार्यक्रम व रोजगार मेळावा संपन्न
प्रतिनिधी = गणेश ठाकरे, लासलगाव दि.५ जानेवारी २६
आज दि.५ जानेवारी रोजी निफाड पंचायत समितीच्या सभागृहात सामाजिक समतेचा अभिनव संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे मा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओमकार पवार सर यांच्या संकल्पनेतून व , मा प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक परिवर्तनवादी नाविन्य पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात एकल महिलाना स्वयं रोजगार निर्माण व्हावा याबाबत मार्गदशन करण्यासाठी श्री संदीप गडाख जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन व RSETI चे प्रशिक्षक राजेंद्र पवार मार्गदर्शन करण्यात आले विधवा,परित्यक्ता,घटस्फोटित व एकल महिलांच्या समस्या, हक्क आणि गरजांवर सखोल चर्चा करण्यात आली. या महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, त्यांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण व्हावे तसेच समाजातील भेदभाव,रूढी आणि गैरसमज दूर व्हावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला, तसेच गावातील धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्या महिलांचा इतरांप्रमाणे सन्मानाने वागणूक मिळावी यासाठी विधवा,परीत्यक्ता,घटस्फोटीत व एकल महिलाचा हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन वान देण्यात आला हि परिवर्तनाची मुह्र्त मेढ आज रोवण्यात आली.
या कार्यक्रमामुळे समाजात सकारात्मक सामाजिक वातावरण निर्माण होणार असून समानता, सन्मान व न्यायाची मूल्ये अधिक दृढ होणार आहेत. महिलांच्या स्वाभिमानाचे संरक्षण करण्यासाठी उचललेले हे पाऊल समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे
.सदर कार्यक्रमसाठी प्रमुख उपस्थिती निफाडच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सहगटविकास अधिकारी श्री.सुनील पाटील, श्री.संदीप गडाख जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन, RSETI चे प्रशिक्षक राजेंद्र पवार, पंचायत समिती निफाड सर्व विभाग प्रमुख,तालुका उमेद अभियान तील सर्व कर्मचारी उपस्थित होते

No comments:
Post a Comment