चिंचोली गावाचा अभिमान : पोपट आढागळे ठरले गावातील पहिले महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल
नामदेव सरोदे
नेवासा. तालुक्यातील चिंचोली गावासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला आहे. नजिकच्या चिंचोली गावातील पोपट आढागळे यांची महाराष्ट्र पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर निवड झाली असून, ते गावातील पहिले पोलीस कॉन्स्टेबल ठरले आहेत. त्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
प्रचंड इच्छाशक्ती, कठोर परिश्रम आणि कधीही हार न मानणारी जिद्द यांच्या जोरावर पोपट आढागळे यांनी हे यश संपादन केले. अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी आपले स्वप्न साकार केले असून, त्यांचा हा विजय केवळ वैयक्तिक नसून तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.
पोलीस दलात सेवा करण्याची तळमळ, कर्तव्यनिष्ठा आणि देशसेवेची भावना यामुळे त्यांची निवड विशेष महत्त्वाची मानली जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करत अभिमानाची भावना व्यक्त केली आहे.
पोपट आढागळे यांच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, महाराष्ट्र पोलीस दलात ते प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून उत्तम सेवा देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment