मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना मुळे ग्रामीण कृषीव्यवस्थेला भाजपा-महायुती सरकारचा मोठा आधार
दर्पण न्यूज+- नेवासा प्रतिनिधी नाथाभाऊ शिंदे
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे शेतातील पीक पेरणी, मशागत, कापणीसाठी तसेच शेतमाल बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी बारमाही मजबूत रस्ते उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात 'मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना' नागपूर हिवाळी अधिवेशन 2025 मध्ये मंजूर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पुढील ४ वर्षांत शेतकऱ्यांना त्यांच्या शेताभोवती पक्के पाणंद रस्ते तयार करून देण्याचा भाजपा-महायुती सरकारचा मानस व संकल्पआहे.
या योजनेनुसार गाव नकाशांवर दर्शविलेल्या रस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित हटविण्यात येणार आहेत. रस्ते बांधणीस लागणाऱ्या गाळ, माती, मुरुम व दगडासाठी कोणतेही रॉयल्टी शुल्क आकारले जाणार नाही. रस्त्यासाठी आवश्यक तातडीची मोजणी शुल्क व पोलीस बंदोबस्त शुल्क पूर्णपणे माफ असेल.
या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना शेतात ये-जा सुलभ होणार असून बाजारपेठेशी संपर्क अधिक मजबूत होईल, त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीव्यवस्थेला मोठा आधार मिळेल. या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य शेत रस्ता व शिवपानंद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी स्वागतच केले आहे
शेत रस्ता व शिवरस्ता संबंधी हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचनाकरिता नेवासा तालुक्याचे आमदार माननीय श्री विठ्ठल रावजी लंघे पाटील यांना लक्षवेधी प्रश्न मांडण्यासाठी नाथाभाऊ शिंदे पाटील व त्यांचे शेत रस्ता व शिवपानंद रस्ता चळवळीतील नेवासा तालुक्यातील सहकारी यांचे वतीने नागपूर येथे जाऊन निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी नामदार चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री, नामदार एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री, व नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब यांना ही निवेदने दिलेली होती या निवेदनाद्वारे माननीय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी मंगळवार दिनांक 9 डिसेंबर २०२५ रोजी माननीय आमदार विठ्ठल रावलंगे पाटील यांनी मंगळवार दिनांक 9 डिसेंबर २०२५ रोजी विधानसभेच्या अधिवेशन कामकाजाचे वेळी लक्षवेधी सूचना प्रश्न मांडला याबद्दल आमदार लंघे पाटील यांचे राज्यातून विशेष कौतुक होत आहे
.jpg)
No comments:
Post a Comment