मुर्तिजापूर येथे 79 वा होमगार्ड वर्धापन दिन साजरा
तालुका प्रतिनिधी गजानन चव्हाण
आज मा.जिल्हा समादेशक यांच्या आदेशाने तहसील मैदान तालुका समादेशक कार्यालय मुर्तिजापूर येथे ता.समादेशक अॅड.दिलीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील मैदान येथे होमगार्ड सैनिक यांनी परिसराची स्वच्छता करुन स्वच्छता अभियान राबविले,नतंर कार्यक्रमाची सुरवात झाली या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबामाता विद्यालय गोरेगांव चे मुख्याध्यापक प्रदिप कांबे तर प्रमुख पाहुणे विष्णु लोडम सामाजिक कार्यकर्ते,अटल फाऊंडेशन विदर्भ अध्यक्ष,उषा वानखडे (व.प.ना)अॅड. दिलीप नाईक,प्रभारी समादेशक अधिकारी मुर्तिजापुर हे होते,अध्यक्ष यांनी अॅड नाईक हे विधीतज्ञ असुन होमगार्ड यांना त्यांचा खुप फायदा होणार आहे असे आपल्या भाषणात सांगत होमगार्ड चे कौतुक करीत मोलाचा संदेश देत होमगार्ड वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या,प्रमुख पाहुण्यांनी सर्व होमगार्ड यांना मार्गदर्शन करित शुभेच्छा दिल्या,सर्व धर्माचे लोक होमगार्ड मध्ये आहे पण होमगार्ड चा एकच धर्म आहे तो फक्त खाकी असे गौरव उदगार विष्णु लोडम यांनी काढले , कार्यक्रमाचे प्रास्ताविक,आभार अॅड. दिलीप नाईक यांनी केले सर्व महीला ,पुरुष होमगार्ड सैनिक, अधिकारी कर्मचारी यांना श्रीराम प्रापर्टी डिलर चे संचालक व होमगार्ड सैनिक राम भिंगारे यांनी नाश्ता व चायपाण्याची व्यवस्था केली,कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माजी.ता.समादेशक.अधि.संंतोष महल्ले कार्यालयाचे लिपीक महादेव नेमाडे,शिपाई क्रिष्णा रुमाले,व ईतर सैनिकांनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment