जिजाऊ इंटरनॅशनल स्कूल, जाफ्राबाद येथे स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात.

 



टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर

जिजाऊ इंटरनॅशनल स्कूल, जाफ्राबाद येथे वार्षिक स्नेहसंमेलन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन व नाट्यविष्कारातून आपले कलागुण सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

दैनंदिन अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे गरजेचे असल्याने शाळा स्तरावर अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. विविध राज्यांतील सांस्कृतिक व पारंपरिक वारसा जपण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यनाट्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री सौ. गुंजन पाटील, मुकेश भारद्वाज, संजय लहाने, सलमान पठाण, भास्कर लहाने, उमेश इंगळे, प्रमोद कळंबे, दादाराव गायके, रामेश्वर दिवटे, कैलास लोखंडे, विठ्ठल बकाल, पूजा पंडित, शीतल भोपळे, वामन चव्हाण, सुरेखा खरात, अंबादास मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. नगराध्यक्षा जाफ्राबाद डॉ. सौ. सुरेखाताई लहाने यांनी स्थान भूषविले.

हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक शिंपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शुभ्रा लोखंडे हिने केले.

No comments:

Post a Comment