मॉडर्न इंग्लिश स्कूल, जाफ्राबाद येथे ‘आनंद नगरी’ उत्साहात साजरी.
टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
मॉडर्न इंग्लिश स्कूल, जाफ्राबाद येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व उद्योजकतेला वाव देणारा ‘आनंद नगरी’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक सुरेश त्र्यंबक दिवटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवृत्ती दिवटे, शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. जावळे, शेख अजीम, प्रदीप चव्हाण, के. एस. गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाय. आर. आदबने, ए. व्ही. काकडे, एम. ए. शहा, एस. एस. भुतेकर, सि. टी. दिवटे, एम. के. चिंचोले, आर. आर. टोम्पे मॅडम, एस. आर. संन्यास मॅडम, व्ही. एन. पंडित मॅडम, एस. पी. अक्कर मॅडम, पी. ए. छडीदार मॅडम, ए. एस. जावळे मॅडम तसेच एस. पी. पडोळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
या आनंद नगरीत शाळेतील तब्बल 70 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपली पाककला व व्यवस्थापन कौशल्ये सादर केली. विद्यार्थ्यांनी घरून तयार केलेले साहित्य आणून शालेय आवारात एकूण 70 दुकाने उभारली. मेळाव्यात सुमारे 35 हजार रुपयांची उलाढाल झाली.
विद्यार्थ्यांनी उभारलेल्या स्टॉलमध्ये गुलाब जामुन, भेळ, पाणीपुरी, कचोरी, गाजर हलवा, वडापाव, समोसे, रगडा, पोहे, पापड, सॅन्डविच, ढोकळा, पास्ता, चहा, चॉकलेट, पान स्टॉल, फूड स्टॉल, चाट पुरी, शो पुरी तसेच इटली स्टॉल आदी विविध खाद्यपदार्थांचा समावेश होता.
या उपक्रमास शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भेट देत आनंद लुटला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकही आवर्जून उपस्थित होते. ‘आनंद नगरी’मुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, संघटन कौशल्य व उद्योजकतेची भावना वृद्धिंगत झाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
.jpg)
No comments:
Post a Comment