ई . बी. के. विद्यालयाची शैक्षणिक सहल थेट हैद्राबाद येथील रामोजी फिल्मसिटीत.



टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर

शालेय उपक्रम म्हणून जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील सेठ ई बी के उर्दू विद्यालयाची शैक्षणिक सहल 600 कि मी अंतर पार करून शनिवारी थेट हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटीला गेली. या सहलीत विद्यार्थ्यांनी चित्रपटात मारधाड कशी केली जाते, ॲक्शन सीन कशे शूट केली जातात, लाइव्ह परफॉर्मन्स, बाहुबली सेट, चंद्रमुखी सेट, एअरपोर्ट, रेल्वेस्टेशन, हवा महल, जापानी गार्डन, युरेका, लाइव्ह शूटिंग सह गीतसंगीत, आणि रामोजी फिल्मसिटी तर्फे दुपारच्या जेवणाचा आस्वाद ही घेतला.

 हैदराबाद, तेलंगणा येथे असलेले जगातील सर्वात मोठे एकात्मिक फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स आहे, जे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदणीकृत आहे, याची स्थापना १९९६ मध्ये तेलगू मीडिया टायकून रामोजी राव यांनी केली. याचे क्षेत्रफळ सुमारे २००० एकर (810 हेक्टर) पेक्षा जास्त पसरलेले आहे.हे जगातील सर्वात मोठे फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स म्हणून ओळखले जाते. जेथे ५० हून अधिक शूटिंग फ्लोअर्स आणि अनेक सेट उपलब्ध आहेत, जिथे एकाच वेळी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण होऊ शकते, यात विविध आकर्षक सेट, लाईव्ह शो, थीम पार्क आणि अनेक मनोरंजन सुविधा आहेत, जे पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षण आहे. रामोजी फिल्मसिटीमध्ये बाहुबली, चेन्नई एक्सप्रेस, चंद्रमुखी, सूर्यवंशम, पुष्पा,  बाहुबली, RRR, चेन्नई एक्सप्रेस,  सिंघम, गोलमाल, आणि क्रिश ३ यांसारख्या अनेक गाजलेल्या हिंदी, तेलुगू आणि इतर प्रादेशिक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.

मुख्याध्यापिका एस आर शेख व शिक्षक फकरू कुरेशी, शेख साबेर, अबरार पाशा, मोहम्मद जुनेद, शकील तडवी या शिक्षकांच्या मार्गदर्शनात जवळपास 50 विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक सहल आनंद व उत्साहात पूर्ण केली.

No comments:

Post a Comment