आमदार साहेब कलगाव गुंज रस्त्याच्या रोड कडे लक्ष द्या
महागाव, प्रतिनिधी अक्षय डोंगरे
महागाव : तालुक्यातील कलगाव ते गुंज रस्त्याची चाळणी झाली असून या रस्त्यावरून पायी चालणे सुद्धा कसरत समजावी लागत आहे रस्त्याच्या निर्मितीसाठी निधी मिळत नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचे भिजत घोंगडे आहे फक्त डागडूजी करण्यावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग धन्यता मानत असून वाहन चालकासह नागरिकांना या हृदय रस्त्याचा सामना करावा लागत आहे आमदार साहेब या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष देऊन निधी उपलब्ध करावा अशी मागणी तालुक्यातील जनतेतून करण्यात येत आहेतालुक्यातील प्रलंबित असलेले प्रश्न या विभागाचे आमदार किसनराव वानखेडे हे मार्गी लावतील अशी अपेक्षा भोळ्या भाबड्या जनतेला होती परंतु राज्य शासनाकडून सत्ताधारी आमदारालाच निधी मागण्याची वेळ येत असल्यामुळे तालुक्यातील प्रलंबित विकास कसा होणार असा प्रश्न देखील आता उपस्थित झाला आहे कलगाव ते गुंज रस्ता पूर्णत उघडला असून रस्त्यावर मोठ मोठे
300 कोटींचा प्रस्ताव धुळखात
■ सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून राज्य शासना कडे रस्ता मजबुतीकरणं करण्यासाठी तत्कालीन उप अभियंता उघडे यांनी 300 कोटींचा प्रस्ताव मंजुरीकरिता पाठविला होता परंतु गेल्या तीन वर्षा पासून हा प्रस्ताव मंत्रालयात धुळखात पडून आहे.
कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात
■ दरवर्षी या रस्त्याच्या नूतनकरणा साठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येत आहे या रस्त्यात काळी माती असल्या मुळे हा रस्ता कितीही मजबूत केला तरी तो काही वर्षातच नामाशेस होत असल्याचे चित्र आहे
■ हा रस्ता सिमेंट काँक्रीट ने करण्यात आला तर निश्चितच या रस्त्याचा कालावधी वाढणार आहे या रस्त्या वरून मोठ्या प्रमाणात पुसद वासिम
काकडे जाणाऱ्या वाहनाची रेलचेल असते धुळीमुळे वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अनेकदा खड्ड्या मुळे अपघाताचे प्रमाण देखील घडले आहेत हा सिमेंट रस्ता करण्या साठी आमदार यांनी शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी तालुक्यातून करण्यात येत आहेखड्डे पडले आहे या रस्त्यावरून वाहन चालवणे तारेवरची कसरतच समजावी लागते या रस्त्यालगत दोन कारखाने असल्याने उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे कारखाना प्रशासनाला या खड्याचे काही देणे घेणे नाही असा प्रश्न आता जनतेतून विचारल्या जात आहे

No comments:
Post a Comment