गाय गोठा अनुदान योंजना अडचणीत



घरकुल,गायगोठा,सिंचन विहिरींचे अनुदान देण्यासह मस्टर झिरो करणाऱ्या बिडीओंवर कारवाईची मागणी रोहयो मंत्री भरत गोगावले व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना विधानभवनात दिले निवेदन आश्वासनानंतर नारायण लोखंडे, विकास जाधव यांचे उपोषण स्थगित

दर्पण न्यूज:- नेवासा प्रतिनिधी नाथाभाऊ  शिंदे 

रोजगार हमी योजनेत एका गावात वीसपेक्षा अधिक कामांना मंजुरी दिली जात नसल्याने अनेक कामे यामुळं थांबलेली आहे.त्यामुळं तात्काळ रोजगार हमी योजनेत वैयक्तिक कामांवर घातलेली वीस कामांची अट रद्द करावी,बेकायदेशीर संप करून मस्टर झिरो करणाऱ्या बिडीओंवर शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच घरकुल,वृक्षलागवड, गायगोठा,सिंचन विहिरींचे अनुदान तात्काळ वितरीत करावे,एका जॉब कार्ड लाभार्थ्यांला सात लाख रुपयांपर्यंत घातलेली मर्यादा वाढवावी,प्रलंबीत प्रकरणे मार्गी लावावे आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी कडाक्याच्या थंडीत नागपूर येथे विधान भवना समोर यशवंत स्टेडयम मध्ये तीन दिवसापासून आमरण उपोषणास सुरुवात केली होती.यामध्ये नारायण लोखंडे,विकास जाधव,बाबाराव ढोणे,मधुकर कांबळे आदींनी यामध्ये सहभाग घेतला होता.उपोषणाची दखल रोहयो मंत्री भरत गोगावले व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली.उपोषणकर्ते नारायण लोखंडे व विकास जाधव यांना विधानभवनात बोलावून संबंधित मागण्यांबाबत चर्चा करून मंत्र्यांनी निवेदन स्वीकारले.तसेच रोहयो योजनेत घातलेली 20 कामांची अट रद्द करण्यासाठी व गायगोठा,सिंचन विहीर,वृक्षलगावड कुशल निधी देण्यासंदर्भात मनरेगाच्या आयुक्तांना निर्देश देणार असल्याचे मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले तर राज्यातील सर्व बिडिओनी मनरेगाच्या कामावर बहिष्कार टाकल्याने लाभार्थ्यांचे कामे प्रलंबीत राहू नये यासाठी ग्रामविकास सचिवांशी बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment