न्यू इंग्लिश स्कूल नेवरे शाळेला फिरती ढाल

 


संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)

मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे बळीराम परकर विद्यालय मालगुंड येथे शनिवार दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.

         इयत्ता दहावीसाठी    मालगुंड परीक्षा केंद्रात समाविष्ट असणाऱ्या ज्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागेल त्या शाळेला मालगुंड एज्युकेशन सोसायटी कडून फिरती ढाल देण्यात येते. त्याप्रमाणे नेवरे धामणसे शिक्षण संस्था संचालित न्यू इंग्लिश स्कूल नेवरे चा निकाल सन 2024/ 25 चा 100% लागल्याने माननीय शिक्षण अधिकारी मेंगाने साहेब यांच्या हस्ते फिरती ढाल प्राप्त झाली.

         तसेच निनाद चंद्रशेखर जोशी या विद्यार्थ्यांने मालगुंड केंद्रात चौथा क्रमांक मिळविला. त्या प्रित्यर्थ सर्व विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे नेवरे धामणसे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. उत्तम जी मोरे, उपाध्यक्ष श्री शरदजी कापसे, सचिव श्री.विजय जी आयरे, सहसचिव  सौ.नितिषा मोरे, कोषाध्यक्ष श्री. दीपक जी फणसे संचालक मनोहर जी मोरे, संदीप जी कुल्ये सर, उदय जी आरेकर, श्री. शैलेंद्र जी आरेकर, श्री मुकुंद जी परांजपे ,श्री. मनोज जी हळदणकर,एडवोकेट स्वातीताई आरेकर, श्री. श्रीकांत जी देसाई, श्री. प्रसाद जी लोगडे, मुख्याध्यापिका शोभा खोत यांच्यातर्फे सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

No comments:

Post a Comment