24 डिसेंबरचा प्रकार भोवणार? सावळदबारा विद्युत उपकेंद्रात बेकायदेशीर घुसखोरी;
अधिकाऱ्यांचे आदेश झुगारून नेते-कार्यकर्त्यांची कायद्याला हरताळ?”**
**श्रेयवादाच्या नादात प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश,‘सुओ मोटो’ चौकशीमुळे दोन्ही पक्षांसह अधिकारीही रडारवर!**
सोयगाव प्रतिनिधी दिलीप मोरे
दिनांक 24 डिसेंबर रोजी सावळदबारा येथील 33 केवी विद्युत उपकेंद्रात 5 एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवताना गंभीर नियमभंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे.प्रतिबंधित क्षेत्र असल्याचे स्पष्ट असतानाही दोन्ही राजकीय पक्षांतील नेते, कार्यकर्ते व कॅमेऱ्यासह आलेले व्यक्ती थेट यंत्रणेजवळ घुसल्याने सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहेमहत्त्वाचे म्हणजे, तेथील जबाबदार अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही काही व्यक्तींनी त्या आदेशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत कायद्याची पायमल्ली केल्याचे व्हायरल व्हिडिओ व छायाचित्रांतून स्पष्ट होत आहे.
या प्रकरणाची शासन व वरिष्ठ प्रशासनाने गंभीर दखल घेत ‘सुओ मोटो’ चौकशी सुरू केली असून, सोशल मीडियावरील व्हिडिओ, फोटो व माध्यमांतील बातम्या थेट पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय विद्युत कायदा 2003 अंतर्गत अनधिकृत प्रवेश, शासकीय कामात अडथळा व सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात घालणे या कलमान्वये घुसखोरांवर तसेच त्यांना रोखण्यात अपयशी ठरलेल्या जबाबदार कर्मचाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
आता या प्रकरणात फक्त कार्यकर्तेच नव्हे, तर तेथील उपस्थित अधिकाऱ्यांचीही भूमिका तपासली जाणार असल्याचे संकेत मिळत असून,कायदा डोळ्यादेखत मोडला गेला का? आणि त्याला मूक संमती दिली गेली क याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
**“आदेश धुडकावले, नियम मोडले;
आता ‘सुओ मोटो’ चौकशी बोलेल —
कायद्यापुढे नेते-कार्यकर्ते-अधिकारी सगळे समान!”*

No comments:
Post a Comment