आयडीयल इंग्लिश स्कूल, शेख हुसेन इंग्लिश हायस्कुल अँड ज्यू. कॉलेज मध्ये कला, हस्तकला आणि विज्ञान प्रदर्शनाचे भव्य आयोजन
संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)
महाड: आयडीयल इंग्लिश स्कूल, शेख हुसेन काझी इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, महाड-रायगड येथे कला व हस्तकला, विज्ञान व सामाजिक शास्त्र प्रदर्शन-२०२५ मोठ्या उत्साहात पार पडले.या प्रदर्शनाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन व सामाजिक जाणीव निर्माण करणे हा होता. प्रदर्शनात विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयातील कार्यकारी मॉडेल्स, सामाजिक शास्त्र विषयावरील तक्ते तसेच आकर्षक कला व हस्तकलेचे साहित्य सादर केले.
विज्ञान विभागात जलसंवर्धन, नवीकरणीय ऊर्जा, मानव शरीरप्रणाली, ज्वालामुखीचा उद्रेक, कृषी कचऱ्यापासून वीजनिर्मिती, शहरी शेती: हरित भविष्यासाठी स्मार्ट उपाय, किटकांसाठी अभिनव प्रति्बंधके, यांसारखी उपयुक्त मॉडेल्स मांडण्यात आली होती. सामाजिक शास्त्र विभागात भारतीय संस्कृती, लोकशाही व्यवस्था, ऐतिहासिक किल्ले, पर्यावरण संवर्धन इत्यादी विषयांवर आधारित प्रदर्शन भरविण्यात आले. कला व हस्तकला विभागात विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा सुंदर आविष्कार पाहायला मिळाला. या विज्ञान प्रदर्शनात एकूण 102 प्रोजेक्ट्स सादर करण्यात आले होते.
प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष आणि महाड नगर परिषदेचे सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले नगरसेवक वजीर उस्मान कोंडीवकर यांच्या शुभ हस्ते आणि संस्थेचे सचिव असफ पल्लवकर, फरहा कोंडीवकर, फहीम कोंडीवकर, डॉ. हवा अस्लम पानसारी, शिक्षक पालक सदस्य, आजी माजी विद्यार्थी आणि अनेक शिक्षणप्रेमी यांच्या विशेष उपस्थितीत केले.
या निमित्ताने महाड नगर परिषदेत सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले नगरसेवक वजीर कोंडीवकर आणि पहिल्यांदा निवडून आलेल्या आयडीयल इंग्लिश स्कुल च्या माजी विद्यार्थिनी डॉ. हवा अस्लम पानसरी यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पालक व नागरिकांनी प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या कौशल्याचे, सर्जनशीलतेचे कौतुक केले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या सादरीकरण केले. हे प्रदर्शन शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत उपयुक्त ठरले असून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात व ज्ञानात भर घालणारे ठरले. असे प्रतिपादन यावेळी बोलतांना प्राचार्य संभाजीराव सूर्यवंशी, आणि मुख्याध्यापिका वर्षा मालुसरे यांनी केले. शालेय व्यवस्थापन, प्राचार्य, मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांच्या उस्फुर्त आणि विशेष सहकार्याने यशस्वी झाले.

No comments:
Post a Comment