“ज्ञानदान — समाजासाठी, मुलांसाठी…”दुर्गा पॉलिथर्म प्रा. लि., अहिल्यानगर तर्फे शालेय साहित्य भेट

 


वार्ताहर- नवनाथ घावटे- नेवासा.

खरवंडी नं. १ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अलीकडेच एक आनंददायी क्षण उजळून गेला.दुर्गा पॉलिथर्म प्रायव्हेट लिमिटेड, अहिल्यानगर यांच्या वतीने शाळेला तब्बल ₹२५,००० किमतीचे शैक्षणिक साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले.यामध्ये दोन मोठी कपाटे तसेच चार खुर्च्यांचा समावेश असून, विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे वातावरण अधिक समृद्ध करण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे.

“शाळा हीच गावाची शान — आणि मुलांचे स्वप्न म्हणजेच उज्ज्वल भविष्य,”या भावनेतून ही अर्थपूर्ण मदत देण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौजे खरवंडीचे उपसरपंचश्री. संतोष पाटील राजळे हे उपस्थित होते. त्यांनी सर्व ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती तर्फेदुर्गा पॉलिथर्म प्रा. लि. चे मालक श्री. संदीप काशिनाथ मोरे (वांबोरी) यांचे मनःपूर्वक आभार मानले.

यावेळी मौजे खरवंडीचे पोलीस पाटील श्री. संदीप कचरु फाटके पाटील यांनी शालेय रंगकामासाठी ₹५,००० देण्याची घोषणा केली.माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. दत्ता कुऱ्हे यांनी,माजी विद्यार्थ्यांतर्फे सुरू असलेल्या रंगकामाला संपूर्ण  सहकार्यदेण्याचे आश्वासन दिले.

समारंभाला ग्रामपंचायत सदस्य श्री. शेखर म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनील भोगे, एसएमसी अध्यक्ष श्री. नागेश कुऱ्हे, तसंच श्री. सुनील राऊत, श्री. यशवंत शिरसाठ, श्री. गणेश रोकडे, श्री. अशोक भोगे, श्री. गणेश भोगे, शिक्षिका सौ. उषाताई मोरे व सौ. सपना गायकवाड, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. शरद खंडागळे यांनी केले,

तर आभारप्रदर्शन श्री. संदीप बोठे सर यांनी मानले.



या उपक्रमातून पुन्हा एकदा जाणवले—

“जिथे हात एकत्र येतात, तिथे स्वप्नांना नवं पंख फुटतात.”

विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी दिलेल्या या मौल्यवान सहकार्याबद्दल

दुर्गा पॉलिथर्म प्रा. लि., अहिल्यानगर यांचे मनःपूर्वक आभार!

No comments:

Post a Comment