त्रिकाल भैरवनाथ महाराज यांच्या पौष महिन्याची खेट यात्रा प्रारंभ निमित्त नेवासाची बहिरवाडी रस्त्याची दुरुस्ती
दर्पण न्यूज:- नेवासा प्रतिनिधी नाथाभाऊ शिंदे पाटील
तिर्थक्षेत्र बहिरवाडी ता नेवासा जि-अहिल्यानगर येथील जागृत देवस्थान भगवान श्रीकाल भैरवनाथांचे आशिर्वाद व दर्शन निमित्त!पौष महिन्यात देशभरातून लाखो भाविक येत असतात/रविवार दि 28/12/2025 पौष महिन्यातील दुसरा रविवार निमित्त नाथाचे दर्शन व यात्रोत्सव|
यावर्षी पाऊस भरपुर झाल्यामुळे श्रीक्षेत्र नेवासा ते तिर्थक्षेत्र बहिरवाडी हा रस्ता संपुर्ण खड्डेमय म्हणजे दुरावस्थेत झाला होता पहिला रविवार श्री भैरवनाथ खेट यात्रा यात्रोत्सव निमित्त आलेल्या भाविकांची होणारे हाल पाहुन आपले नेवाशाचे नवनिर्वाचित आमदार-श्री विठ्ठलराव लंघे साहेब यांनी तातडीने निर्णय घेत शनिवार दि 27/12/2025 रोजी रस्ता तात्पुरता मुरुम टाकून खड्डे बुजवून भाविकांना श्री भैरवनाथांचे दर्शनास येण्यासाठी अत्यंत कमी वेळेत दुरुस्त करून दिला आहे/तिर्थक्षेत्र बहिरवाडी व पंचक्रोशीतील नागरीक व भाविकांनी आमदार श्री विठ्ठलराव लंघेसाहेब यांचे विशेष अभिनंदन व कार्याचे कौतुक केले आहे|श्रीगुरुंचे आशिर्वादाने अशीच श्री भैरवनाथांची सेवा आमदार विठ्ठलभाऊंचे हातुन घडत रहावी हीच श्री भैरवनाथांचे चरणी प्रार्थना राम कृष्ण हरि

No comments:
Post a Comment