कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये डॉ पंजाबराव देशमुख जयंती साजरी..



 प्रतिनिधी - हेमंत कोंडे 

(वरुड दि २८)स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती वरूड मधील कर्मयोगी संत गाडगेबाबा सभागृह येथे नुकतीच डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची 127 वी  जयंती साजरी करण्यात आली , यावेळी  ड्रॉ पंजाबराव देशमुख यांचे जीवन पट व त्यांचे समाजहितासाठी केलेले कार्य यावर संबोधित करण्या करीता प्रमुख वक्ते म्हणून नेहरू कला महाविद्यालय नेर परसोपंत येथील प्रा प्रवीणजी बनसोड उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उद्धवजी वानखेडे ,  होते तर कार्यक्रमाचे  प्रमुख अतिथी मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती नरेंद्र उर्फ बबलू  पावडे, बाबाराव बहुरूपी ,अरविंद वानखेडे , वासुदेव लांडगे कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक झाबु शेठ आदि उपस्थित होते प्रूख वक्ते  प्राध्यापक प्रवीण बनसोड यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे कार्य आणि विचार सामाजिक जीवन जगताना कसे महत्त्वाचे आहेत हे नमूद केले तर कायक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापक उमेश बंड  यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन सी टी पठाण सर यांनी केले तर  पाहुण्यांचा परिचय कॉम्रेड अरविंद वानखडे यांनी करून दिला तर पाहुण्याचे व उपस्थितांचे आभार  नरेंद्र पावडे यांनी मानले कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद पाटील प्रवीण मानकर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तुषार निकम कार्यकारी संचालक राहुल चौधरी  शेतकरी नेते दिलीप भोयर निळूभाऊ यावलकर युवराज कराळे  शशिकांत बेलसरे जितेंद्र शेटीये तायवाडे सर अशोकराव धवडे रघुनाथ दहीवडे हरीश आजनकर सतीश सोनुले मुख्याध्यापक मजूर संघटनाच्या अफरोज बी संगीताताई भराडे शकील सर कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव नंदकिशोर बोडखे कर्मचारी मनोज ढोके जयंत मस्की  रंजना मस्की सविता काळे  तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे शेकडो मंडळी कृषी उत्पन्न बाजार समिती चे कर्मचारीउपस्थित होते

No comments:

Post a Comment