शास्त्रीय दृष्टिकोनातून भौतिकशास्त्राचा बाऊ संपवा; महाडमध्ये 'अल्फा सेमिनार'ला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद
संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)
महाड: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मनात भौतिकशास्त्र (Physics) या विषयाबद्दल असलेली भीती दूर करून त्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने महाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे 'अल्फा चॅलेंज सेमिनार' उत्साहात पार पडला. 'साई छाया एज्युकेशन सोसायटी' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक आणि भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राचे (BARC) माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. सलीम अख्तर यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. "भौतिकशास्त्र हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. संकल्पना स्पष्ट असतील, तर परीक्षेत यश मिळवणे सहज शक्य आहे," असे त्यांनी आवर्जून सांगितले.
या विशेष चर्चासत्राचे आयोजन साई छाया एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. महेश बगडे यांच्या वतीने करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विनामूल्य उच्च दर्जाचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम १००% मोफत राबवण्यात आला. "विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणे आणि त्यांच्या ज्ञानाची दारे खुली करणे हेच आमचे ध्येय आहे," असे मत डॉ.महेश बागडे सर यांनी यावेळी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला आयु. सौ. राऊत मॅडम, श्री. साळवी सर, सय्यद तंझिल सर आणि संस्थेचे इतर मान्यवर उपस्थित होते.
महाड परिसरातील पालकांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल आयोजकांचे आभार मानले आहेत. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सकपाळ अपर्णा मॅडम यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव आयु. गंगावणे सर यांनी केले आणि कार्यक्रमांची सांगता राष्ट्रगीताने झाली.

No comments:
Post a Comment