दिव्यांग कल्याणी निधी उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा
महागाव प्रतिनिधी अक्षय डोंगरे
महागाव नगरपंचायत यांच्याकडून दिव्यांग कल्याण निधी गेल्या तीन वर्षापासून रखडलेला होता त्यास प्राधान्य क्रमाने घेऊन दिव्यांग कल्याण निधी वाटप करण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले अशा प्रकारच्या बातम्या नगरपंचायत कार्यालयाने वर्तमानपत्रात टाकल्या परंतु वास्तविक पाहता अनेक अपंग या यादीतून वगळण्यात आले यापैकी एक नाव म्हणजे ऋतिक अवधूतराव नरवाडे नगरपंचायत कार्यालयाने दिलेल्या सूचनेप्रमाणे लाभार्थ्याचे वडील अवधूतराव नरवाडे यांनी ऋतिक याची सर्व कागदपत्रे नगरपंचायत कार्यालयात दिले त्यामध्ये 100% अपंगत्व असल्याचं प्रमाणपत्र मध्यवर्ती बँक पासबुक झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स व त्यांनी अनेक वेळा नगरपंचायत कार्यालयाच्या चक्रा मारल्या व यामुळे त्यांची प्रचंड प्रमाणात पायपीठ झाली व त्यांची रोजमजुरी पडून त्यांना आर्थिक नुकसान व त्यांना उडवा उडवीची उत्तरे यावेळी नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली व मानसिक त्रास झाला या त्रासाला कंटाळून त्यांनी आज दिनांक ३०/१२/२०२५ रोजी नगरपंचायत कार्यालयाला निवेदनाद्वारे इशारा दिला की निधी जमा करा अन्यथा मला आमरण उपोषण करावे लागेल व यासोबत इतरही लाभार्थ्यांचा राहिलेला निधी त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा ही मागणी यावेळी करण्यात आली यावेळी भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष महागांव विवेक राजेंद्र नरवाडे व अवधूत विश्वनाथ नरवाडे उपस्थित होते

No comments:
Post a Comment