छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिवसेना युती तुटली; पालकमंत्री संजय शिरसाट यांची घोषणा .
प्रति . पांडुरंग गायकवाड
छत्रपती संभाजीनगर: शहरात महत्त्वाची राजकीय घटना घडली आहे. भाजप आणि शिवसेना युती तुटल्याची अधिकृत घोषणा आज पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली. उमेदवारी अर्जांचा कालावधी संपेपर्यंत दोन्ही पक्षांत युती कायम राखण्याचे वादविवाद चालू होते, मात्र आज अखेर यावर पूर्णपणे पडदा पडला आहे.
शहरात तब्बल ९ बैठकांमध्ये स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा झाली. यामध्ये एक बैठक भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासहही पार पडली. परंतु या चर्चांनंतरही युतीत एकमत न झाल्यामुळे अनेक मतभेद स्पष्ट झाले.
पालकमंत्री शिरसाट यांनी यावेळी आरोप केला की, भाजपने आम्हाला खेळवत ठेवले आणि शेवटी विश्वासघात केला. त्यांच्या मते युती टिकवण्यासाठी प्रयत्न केले गेले, मात्र अपेक्षित परिणाम साधता आले नाहीत.

No comments:
Post a Comment