वाकद परिसरात दिवसा थ्री फेज विजेची मागणी
प्रतिनिधी: गणेश ठाकरे लासलगाव
: निफाड तालुक्यातील वाकद, कानळद, शिरवाडे परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातच वीज मंडळातर्फे रात्रीच्या वेळेस थ्री फेज वीज पुरवठा केला जात आहे. यामुळे दिवसा थ्री फेज वीज पुरवठा करावा या मागणीचे निवेदन वीज मंडळाच्या अधिकऱ्यांना देण्यात आले.
वाकद शिवारात चार ते पाच बिबटे दररोज कोणाला तरी दिसत आहे. यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांना नाईलाजास्तव रात्रीच्या वेळेस शेतात पाणी भरण्यासाठी जावे लागते. यामुळे वाकद, शिरवाडे, कानळद, मुखेड, देवगाव कोळगाव, मानोरी येथे शेतीसाठी दिवसा थ्री फेज वीज पुरवठा सुरू करावा या मागणीचे निवेदन कानळद येथील कनिष्ट अभियंता प्रदीप भालेराव यांना देण्यात आले. याबाबत ग्रामपंचायतीचा ठराव करण्यात आला होता. निवेदन देताना वाकद येथील सुनील गायकवाड, रमेश बडवर, सतीश गायकवाड, प्रमोद बडवर, साहेबराव बडवर, सतीश बडवर, भाऊसाहेब शिंदे, राजेंद्र गायकवाड, दीपक बच्छाव, राहुल बडवर, कैलास गायकवाड यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment